बडोदा, ता. २५ : माजी कर्णधार हरमनप्रीत कौर व अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा या जोडीने रविवारी झिम्बाब्वेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघींनी पाचव्या विकेटसाठी १५३ धावांची धडाकेबाज भागीदारी केली. हरमनप्रीत कौर हिने १२६ धावांची आणि दीप्ती शर्माने नाबाद १०६ धावांची खेळी साकारली. दोघींच्या झंझावाती खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सहा बाद ३२८ धावा फटकावता आल्या.
टी-२० मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करणाऱ्या भारतीय महिला संघाने पहिला एकदिवसीय सामना जिंकत १-० अशी आघाडी मिळवली होती. रविवारच्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय महिला संघाचा दबदबा दिसून आला. हरमनप्रीत कौर हिने १२१ चेंडूंमध्ये १५ चौकारांसह १२६ धावांची खेळी साकारली. दीप्ती शर्मा हिने ८६ चेंडूंमध्ये १५ चौकारांसह नाबाद १०६ धावांची खेळी साकारली. हरमनप्रीत कौर हिने आठवे शतक झळकावले. दीप्ती शर्मा हिने दुसरे शतक साजरे केले.
दीप्तीचा विक्रम
दीप्ती शर्मा हिने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकावण्याची किमया करून दाखवली. एकदिवसीय प्रकारात अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. याआधी रिचा घोष हिने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध खेळताना मागील वर्षी ९४ धावांची खेळी साकारली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.