पुणे

Loksabha 2019 : प्रज्ञासिंह ठाकूरसारखी प्रवृत्ती मतदानातून ठेचा : हर्षवर्धन पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे :"अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर, भाजपच्या विरोधात मतदान करा'', असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शरद रणपिसे, विश्‍वजित कदम, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, रशीद शेख, नगरसेवक अविनाश बागवे, मौलाना निजामुद्दीन, शालक पाटील, राजेंद्रसिंग वालिया, मौलाना काझमी, अमीर शेख, नदीम मुजावर, राजू इनामदार, राजेंद्र नायर, अय्याज खान, श्‍यामला सरदेसाई आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सरकारचा उल्लेख व्यक्तिगत नावाने करतात. आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांनी कधी सरकारचा उल्लेख स्वत:च्या नावाने केल्याचे ऐकिवात नाही. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी.'' उल्हास पवार म्हणाले, ""ज्यांचा सामाजिक ऐक्‍यावर, सर्वधर्म समभावावर, पुरोगामित्वावर विश्‍वास आहे त्यांना मतदान न करण्याची चूक आपण केली तर देशात पुन्हा निवडणूक होईल की नाही, अशी स्थिती आहे.'' 

पालकमंत्री व खासदार कुठे होते? 
कोणतीही पूर्वसूचना न देता, पोलिसांनी हेल्मेट न घातलेल्या पुणेकरांकडून सक्तीने दंड वसूल करून, त्यांचा मानसिक छळ केला तेव्हा पालकमंत्री गिरीश बापट व खासदार अनिल शिरोळे कुठे होते?, असा सवाल हेल्मेटविरोधी कृती समितीने केला आहे. हेल्मेट सक्तीबाबत कोणतीही भूमिका न घेता निष्क्रिय राहिलेल्या सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींबाबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समितीच्या ज्येष्ठ सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT