ट्रॅक्टर चालवून हर्षवर्धन पाटील यांनी जिंकली शेतकऱ्यांची मने sakal
पुणे

ट्रॅक्टर चालवून हर्षवर्धन पाटील यांनी जिंकली शेतकऱ्यांची मने

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : जय जवान, जय किसान व जय तंत्रज्ञान ही त्रिसुत्री केंद्रबिंदू मानून शेती व्यवसायास वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनीनियोजन बद्ध पध्दतीने प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

कर्मयोगी कारखाना कार्यक्षेत्रातील कळाशी ( ता. इंदापूर ) येथे विजया दशमी निमित्त शेतकऱ्यांशी सुसंवाद साधताना ते बोलत होते. यावेळी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा सणाच्या दिवशी कळाशी ( ता. इंदापूर ) येथील प्रगतीशील शेतकरी अनिल सूर्यवंशी यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे पूजन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. मात्र त्यांनी याप्रसंगी थेट ट्रॅक्टर चालवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असून ट्रॅक्टर हा आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मित्र बनला आहे. या शुभ मुहूर्तावर अनिल सूर्यवंशी यांनी घेतलेल्या नवीन ट्रॅक्टरचे पूजन करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. कारण मी देखील हाडाचा शेतकरी असून पारंपरिक शेतीव्यवसायास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून मी शेती करत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जे पिकतं, ते शेतीत दर्जेदार पणे पिकवण्यावर भर द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

VIDEO : तुकाराम मुंढे यांचं रक्त काढून...! माजी राज्यमंत्र्याची अजब मागणी, मुख्य सचिवांना लिहिलं पत्र...

Vidhan Parishad Election : मतदानाला काही तास शिल्लक, काँग्रेस उमेदवाराचा डिजिटल प्रचार, पण पक्षाची भूमिका वेगळीच, नेमकं घडतंय काय?

Latest Marathi News Live Update : अमरावती काँग्रेसची पुन्हा बैठक सुरू, वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार?

Waste Project Tender Issue : दक्षताच्या सूचना झुगारुन कचरा प्रकल्पाची निविदा; ठरावीक ठेकादारांना पायघड्या

SCROLL FOR NEXT