पुणे

दौंड : हातवळण ग्रामपंचायत बिनविरोध 

अमर परदेशी

वरवंड : दौंड तालुक्यातील हातवळण येथील स्थानिक दोन्ही राजकीय गटाने एकत्रीत येवून ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध केली.

ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी २० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल होते. मात्र,सोमवारी (ता. ४) माघारीच्या दिवशी चक्क अकरा जणांनी अर्ज माघार घेतल्याने सर्वच नऊ जागा बिनविरोध होण्यास यश आले. बिनविरोध निवडीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रीत जल्लोष केला.

येथील ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग असून एकुण नऊ सदस्य संख्या आहे. मागील काही दिवसापासून गावातील स्थानिक आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात या दोन्ही गटाच्या गट प्रमुखांनी ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार दोन्ही गट प्रमुख व गावातील सामाजीक कार्यकर्त्यांची आपसात चर्चा सुरु होती, मात्र,निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी अपक्षांसह एकुण वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

अखेर माघारीच्या दिवशी दोन्ही गटाने गावासाठी घेतलेली भुमिका व उमेदवारांनी दाखविलेला समंजसपणा यामुळे दोन्ही गटात जागा वाटपात तडजोड झाली. शेवटी सोमवारी वीस पैकी अकरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व नऊ जागा बिनविरोध झाल्या अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बाबर यांनी दिली.

नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढील प्रमाणे :  वार्डक्रमांक एक-योगेश फडके, चैताली फडके, अनिल गवळी. वार्ड क्रमांक दोन-सखाराम शिंदे, प्रगती फडके, सुवर्णा फडके. वार्ड क्रमांक तीन- रमेश जगताप, पुनम गांदले, प्राजक्ता कोऱ्हाळे. 

तत्पूर्वी,निवडणुक बिनविरोध होण्यासाठी जिल्हा दुध संघाचे माजी संचालक नानासाहेब फडके, माजी उपसरपंच रमेश जगताप, माजी सरपंच सागर फडके, सामाजीक कार्यकर्ते मंगेश फडके आदी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी महत्वाची भुमिका बजावली.

याबाबत दोन्ही गटाचे प्रमुख माजी सरपंच सागर फडके व रमेश जगताप म्हणाले,गावच्या विकासासाठी व हितासाठी निवडणुक बिनविरोध होणे अनिवार्य होते. याचा आम्ही दोन्ही गट प्रमुखांनी विचार केला.समंजस पणाने तोडगा काढला. गावातील विकासासाठी आम्ही एकत्रीत काम करणार आहोत. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT