Haveli police take action for non-compliance with rules regarding corona 
पुणे

कोरोनासंदर्भात नियम न पाळल्याबद्दल हवेली पोलिसांची कारवाई

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला( पुणे) : हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन हॉटेलवर कोरोनासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल रॉयल चायनिज, हॉटेल अँक्युरेस यांचेवर हवेली पोलीस स्टेशन यांनी मास्क न घातल्याने सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, कोरोना साथरोग पसरण्यास प्रतिबंध करण्यासाठी कोणतेही नियम पाळले नाही. या प्रकारचे कृत्य करून या हॉटेलमध्ये जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे. महादेव किसन कडू (वय ३२ वर्षे रा.डोणजे ता.हवेली जि.पुणे), राम बहादुर दमई (वय २६ वर्षे रा.रॉयल चायनिज गोऱ्हे बुद्रुक ता. हवेली जि.पुणे, हॉटेल मॅनेजर हेमंत विशेनदत्त जोशी (वय ३० वर्षे) अजय जंगबहादुर भंडारी (वय ३२ वर्षे) नरेश सिंग सामंत (सर्व रा.हॉटेल अॅक्युरेस गोऱ्हे बुद्रुक ता.हवेली जि.पुणे.) यांच्यावर ही कारवाई केली आहे. असे हवेली पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. 

दरम्यान, हवेली तालुक्‍यातील मोठी लोकसंख्या असलेल्या नऱ्हे, नांदेड, वाघोलो, देहू, व उरळी- कांचन या गावांमध्ये सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. स्थानिक पातळीवरील नागरिक यांच्याकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. पालन न करणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाई करण्याच्या आदेश दिले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT