हिंदू-मुस्लीम एकतेचे
प्रतीक असलेल्या दर्ग्याचा ऊरुस
मुंढवा, ता.१४ ः औंधगाव सर्वे नंबर १५२/ ६ बॉडीगेट पोलिस लाईन येथे, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या हजरत सैय्यद लालशावली बाबांच्या उरूस, संदल मिरवणुकीने सुरु झाला.
--दर्ग्यात संदल, उर्स शरीफ, कव्वाली, लंगर असे कार्यक्रम करण्यात आले. या काळात सर्व धर्माचे असंख्य भाविक दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन येथे घडते.
--या प्रसंगी आमदार बापू साहेब पठारे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, मा. उप महापौर परशुराम वाडेकर, बाळासाहेब रानवडे, माजी नगरसेवक बाबू वागसकर, औंध विश्वस्त मंडळ यांनीही बाबांच्या दर्ग्यावर माथा
टेकून दर्शन घेतले. या ठिकाणी कर्नाटकचे प्रसिद्ध कव्वाल तैसिफ जुनैदी यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचा शेवट महाप्रसादाने करण्यात आला. त्याचा लाभ सुमारे आठ हजार भाविकांनी घेतल्याचे कमिटीने सांगितले.
--या प्रसंगी दर्गा उरूस कमेटीचे अध्यक्ष श्रावणकुमार राजपूत, संतोकसिंग पाल, मनीष राजपुत, मकसूद खान, विकी राजपूत, गनी खान, दिनेश कांबळे, हमीद सय्यद, प्रसाद शिंदे, रमीज खान, शकुर खान, रईस सय्यद, इरफान शेख, संतोष पिल्ले, रमेश पवार, हजरत सैय्यद लालशावली दर्गाह जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटी सदस्य यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.