4thief_13.jpg
4thief_13.jpg 
पुणे

पत्नीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली चोरी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पत्नीच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पतीने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एक दुचाकी आणि 1 लाख 22 हजारचा ऐवज या इसमाने लंपास केल्याची घटना समोर आली. 54 वर्षीय अनिल गायकवाड असे त्याचे नाव आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पिंपरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दौंड येथील अनिल आणि त्यांच्या पत्नीवर हृदयाचे उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हलाखीची होती.त्यात अशा स्थितीत ते काही कामही करता येत नव्हते. मुलगा पुण्यात मजुरी करत आहे. पण त्याच्या पगारात आई-वडिलांच्या उपचाराचा खर्च भागत नाही. सात मार्चला अनिल पुण्याच्या रुबी रुग्णालयात तपासणीसाठी आले, तेंव्हा पत्नीच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी अडीच लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला.

रुग्णालयाच्या बाहेर येताच त्यांनी एक दुचाकी चोरली. तेथून तो पिंपरी चिंचवड येथील पाहुण्यांकडे आला. नंतर चिंचवड येथील ज्वेलर्स दुकानाबाहेर रेकी करत असताना एका व्यक्तीने दागिने आणि मोबाईल खरेदी करून आपल्या दुचाकीच्या डिकीत ठेवले. ती व्यक्ती मिठाई खरेदीसाठी गेली असताना अनिलने डिकी उघडून दागिने आणि मोबाईल असा 1 लाख 22 हजाराची मुद्देमाल लंपास केला. 

मात्र, अनिलची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याआधारेच पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केले. तेंव्हा हृदयाच्या शस्त्रक्रीयेसाठी चोरी केल्याचे समोर आले. हलाखीची परिस्थिती असल्याने त्याच्याविरोधात 2010-11 मध्ये ही चोरी केल्याचा गुन्हा खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असल्याची पोलिसांनी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT