PNE18O27412.jpg 
पुणे

अन्‌ त्याने गुटखा सोडला! 

सुवर्णा चव्हाण

पुणे : कॅब चालवतानाही गणेश हा गुटखा खायचा... आयटी कंपनीत काम करणाऱ्या विनायक पटवर्धन यांना ही बाब खटकली. कॅबमधून घरी जाताना ते दररोज गणेशला याचे दुष्परिणाम समजावून सांगत असे. अखेर काही दिवसांनी त्याचे सकारात्मक परिणाम होऊन गणेशने गुटखा सोडला. त्यानंतर पटवर्धन यांनी आयटी कंपन्यांमध्ये केलेल्या जनजागृतीने अनेकांचे मन परिवर्तन झाले असून, त्यांनी तंबाखू, गुटखा खाणे सोडले आहे. 

आयटी कंपनीतील दररोजच्या आठ तासांच्या नोकरीपलीकडे जाऊन सामाजिक कामाची ऊर्मी असणारे पटवर्धन हे गुटखा व तंबाखूच्या दुष्परिणांमाबाबत जनजागृती करीत आहेत. ते खराडीतील एका कंपनीत काम करतात. कंपन्यांमधील कॅबचालक, सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखू व गुटखा खाण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर व कालांतराने कुटुंबावर परिणाम होत असल्याचे पटवर्धन यांच्या निदर्शनास आले. यासाठी काही तरी करावे म्हणून त्यांनी "लॅण्डमार्क संस्थे'चा स्व-परिवर्तन घडवून आणणारा कोर्स पूर्ण केला आणि त्याअंतर्गत त्यांनी सामाजिक प्रकल्प राबविण्याचे ठरवले. 

याचाच एक भाग म्हणून "इटन टेक्‍नॉलॉजीस्‌' या कंपनीतील 70 कॅबचालक, सुरक्षारक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी कार्यशाळा आयोजित केली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांनी कर्मचाऱ्यांना गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. या कार्यशाळेचा सर्वांवर सकारात्मक परिणाम झाला आणि काहींनी तंबाखू व गुटखा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर विनायक हे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांमध्ये जाऊन अशा कार्यशाळा घेत आहेत. 

आजही अनेक जण तंबाखू व गुटखा खाल्ल्याशिवाय राहू शकत नाहीत. त्यांना यापासून परावृत्त करण्याची गरज आहे. यासाठीच मी कंपन्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीसाठी कार्यशाळा घेत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. 
- विनायक पटवर्धन 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT