पुणे विद्यापीठ - प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी आणि बसवंत भरले गुरुजी यांची भावपूर्ण भेट. 
पुणे

....आणि गुरुजींनी मारली प्र-कुलगुरूंना मिठी

सकाळवृत्तसेवा

पुणे - लहानपणी शिकविणाऱ्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांचा वेगळाच जिव्हाळा असतो. विद्यार्थ्याबद्दलही शिक्षकांची ममता तशीच असते. याचाच प्रत्यय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आला. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांचे गुरुजी बसवंत भरले त्यांना भेटायला आले अन्‌ आपल्या विद्यार्थ्याला मिठी मारली. उमराणी यांनीही नतमस्तक होऊन त्यांचे स्वागत केले.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसह अनौपचारिक बैठक सुरू असताना ८० वर्षांचे भरले गुरुजी तेथे आले. उमराणी यांना बघताच गुरुजींनी त्यांची थेट गळाभेट घेतली. ते पाहून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सद्‌गदित झाले. गुरू-शिष्याच्या आठवणी ताज्या होत असताना दोघेही भावुक झाले.

प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी इयत्ता सातवीत सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे गावातील शाळेत शिकत होते. त्या वेळी १९७२ मध्ये दुष्काळ पडलेला होता. अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने भरले गुरुजी यांनी उमराणी यांच्यासह काही विद्यार्थ्यांना दत्तक घेतले होते. आता हाच विद्यार्थी पुणे विद्यापीठाचा प्र-कुलगुरू झाल्याने खास त्यांना भेटण्यासाठी म्हणून गुरुजी भंडारकवठे या गावातून उमराणी यांना भेटण्यासाठी पुणे विद्यापीठात आले. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांपुढे त्या दोघांनाही थोडेसे अवघडल्यासारखे झाले होते. कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हा अनपेक्षित प्रसंग अनुभवता आला.

डॉ. उमराणी म्हणाले, ‘‘गुरुजींना भेटल्याचा मनस्वी आनंद तर झालाच; पण त्या ऋषितुल्य व्यक्तीचे पाय धरण्याची पुन्हा एकदा संधी मला मिळाली. या भेटीमुळे गतकाळ पुन्हा एकदा डोळ्यांसमोर आला.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे-मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! १० दिवसांनंतर 'डेक्कन क्वीन' पुन्हा रुळावर; 'इंटरसिटी'ही आजपासून सुरू

Nagpur News: एसटी प्रवाशांना दिलासा नाही! साध्या बसच्या 10% भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, 1 ऑगस्टपासून पूर्वीचे दर

Latest Marathi News Live Update : वारीत पुन्हा एकदा भीषण अपघात; बारामतीत भरधाव कारनं वारकऱ्याला उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Leopard Sighting Jyotiba Dongar : बाप रे! जोतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात फिरताना दिसला बिबट्या; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV

SCROLL FOR NEXT