herbals sakal
पुणे

‘हीलींग हँड्स हर्ब्स’ला आयुर्वेदिक उत्पादनांचे भारतीय पेटंट

‘हीलींग हँड्स संशोधन आणि विकास विभाग’ने जगातील पहिले वनस्पतीवर आधारित चूर्ण तयार केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘हीलींग हँड्स हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड’, व ‘हीलींग हँड्स संशोधन आणि विकास विभाग’ने जगातील पहिले वनस्पतीवर आधारित चूर्ण तयार केले आहे. त्याचे पेटंट मिळविण्यात हीलींग हँड्स हर्बला यश मिळाले.

भारत सरकारच्या ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया पेटंट्स डिझाईन ट्रेड मार्क्स जिओग्राफिकल इंडिकेशन’ या विभागातर्फे हे पेटंट देण्यात आले. डॉ. गजानन भागवत आणि डायरेक्टर हीलींग हँड्स हर्ब्स प्रायव्हेट लिमिटेड व हीलींग क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. अश्विन पोरवाल यांनी यासाठी मार्गदर्शन केले. या पेटंटसाठी 2014 पासून प्रयत्न सुरू होते. त्यात गेल्या तीन वर्षांपासून त्याचा ‘क्लिनिकल स्टडी’ नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

डॉ. पोरवाल म्हणाले “हे विरेचक दोन प्रकारात आहेत. ‘कॉन्स्टॅक’ सौम्य स्वरूपाच्या बद्धकोष्ठतेसाठी, आणि दुसरे, ‘कॉन्स्टॅक-प्लस’ गंभीर स्वरूपाच्या बद्धकोष्ठतेसाठी वापरण्यात येते. सगळ्या प्रकारच्या पोटाच्या विकारांवर व बद्धकोष्ठतेसाठी एकाच प्रकारचे चूर्ण वापरले जात होते. त्याचे कमी-जास्त प्रमाणात सेवन केल्याने इतर त्रास होत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दोन प्रकारचे विरेचक आपण तयार करायचे निश्चित केले. त्यात आम्हाला यश मिळाले.”

हीलींग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून सुमारे तीस हजार रुग्णांनी हे उत्पादन वापरले, असेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या सचिव डॉ. स्नेहल पोरवाल म्हणाल्या, “पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये मोफत निदान शिबिरे आयोजित करून त्यातून सहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरांमध्ये ‘कॉन्स्टॅक’ व ‘कॉन्स्टॅक–प्लस’चे मोफत वाटप करण्यात आले.”

बद्धकोष्ठतेचे मूळ

- अति प्रवास

- सतत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे

- जेवण आणि झोपेची वेळ न सांभाळणे

- चाळीशीच्या नंतर व्यायामाचा अभाव

- वृद्धापकाळातील समस्या

दुष्परिणाम

- दिवसभर अस्वस्थ वाटणे

- डोके दुखणे

- पोटात कळ येणे किंवा दुखणे

- भूक मंदावणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT