Community temples sakal
पुणे

Pune News : समाजमंदिराच्या ठिकाणी महापालिकेतर्फे होणार आरोग्य केंद्रे

समाजमंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक विविध सुविधांपासून वंचित राहत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - समाजमंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक विविध सुविधांपासून वंचित राहत आहेत. आता याच समाजमंदिराच्या ठिकाणी महापालिकेतर्फे प्राथमिक उपचारांसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी समाजमंदिरांच्या ४२ जागा निश्‍चित केल्या आहेत.

वस्ती आणि झोपडपट्टीतील नागरिकांनी एकत्र यावे, समाजोपयोगी उपक्रम, प्रशिक्षण असे उपक्रम राबवावेत, यासाठी महापालिकेतर्फे समाजमंदिरांचे बांधकाम केले जाते. समाजविकास विभागाकडे १२५ समाजमंदिरे आहेत.

शहरातील या समाजमंदिरांची ‘सकाळ’ने पाहणी केली असता त्यामध्ये नागरिकांना सुविधा मिळण्यापेक्षा या वास्तूंकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले.

त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात समाजमंदिरासाठी तुटपुंजा निधी असतो. त्यामुळे भवन विभाग, क्षेत्रीय कार्यालयांकडून समाजमंदिराच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

घराजवळच मोफत उपचार

समाजमंदिरात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करताना दवाखान्यासारखी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच स्वच्छतागृह, फरशी बदलणे, भिंती रंगविणे यासाठी प्रत्येक केंद्राला २० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे ४२ ठिकाणची समाजमंदिरे कात टाकणार आहेत. शिवाय वस्तीतील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला यांसह अन्य आजारांवर घराजवळच मोफत उपचार मिळणार आहेत.

ताबा घेताना अडचणी

राज्य सरकारने आरोग्यवर्धिनी योजना जानेवारी २०२२ मध्ये सुरू केली. पण पुण्यात जागा मिळत नसल्याने आतापर्यंत १२५ पैकी केवळ चार ठिकाणीच ही सेवा सुरू झाली आहे. आरोग्य विभागाने समाजविकास विभागाकडे समाजमंदिरांची मागणी केली.

पण त्या ठिकाणी वस्तीतील स्थानिक नेते, संस्थांनी कार्यालये थाटली होती, तसेच काहींनी त्याचे धार्मिक स्थळात रूपांतर केले होते. नागरिकांची समजूत काढून या जागा ताब्यात घेताना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे समाजमंदिरांमध्ये एकही आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले नाही.

१२५ केंद्रे उभारणार

शहरातील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी, तसेच महापालिकेतील समाविष्ट गावांमधील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी राज्य सरकारतर्फे १२५ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात २९, तर दुसऱ्या टप्प्‍यात ९६ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रात एक डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एका फार्मासिस्टची नेमणूक करण्यात येणार आहे. ही केंद्र वस्ती पातळीवर असणार आहेत, त्यासाठी समाजमंदिरांच्या जागांचा शोध घेण्यात आला. आरोग्य व समाजविकास विभागाने यासाठी ४२ जागा निश्‍चित केल्या आहेत. ​

समाजविकास विभागाकडून आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी समाजमंदिरांची यादी मिळाली आहे. त्यातील काही ठिकाणी काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणी त्या जागा योग्य आहेत की नाही? याची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे.

- वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT