health check up and PPE kit to revenue employees and talathi in pune.jpg 
पुणे

Corona Virus : 'रेड झोन'मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता पीपीई कीट

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या अतिसंवेदनशील भागांमध्ये सर्वेक्षण आणि अन्नधान्य पुरवण्याचे काम करणाऱ्या तलाठ्यांसह महसूल कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुणे शहर तहसील कार्यालयातील तलाठी आणि अन्य कर्मचाऱ्यांना मंगळवारी वैयक्तिक संरक्षणासाठी  पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्‍क, हातमोजे, द्रवरुप हँडवॉश असे प्रत्येकी सुमारे साडेसहा हजार रुपये किमतीचे किट देण्यात आले. तसेच, प्रतिकारशक्ती वाढीकरि‍ता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामधेनू व तत्वसेवा या संस्थेतर्फे मोफत होमियोपथी औषधे, डॉ. बनसोडे यांच्यातर्फे मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. शहर तहसील कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्‍यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने आयोजित शिबीरात ही तपासणी करण्‍यात आल्याची माहिती तहसीलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांनी दिली.

Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

शहर तहसील कार्यालयांतर्गत झोपडपट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. लॉकडाऊन’मुळे  कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. शहरातील या गरजू, बेरोजगार मजुरांनाक्षेत्रीय अधिकारी म्हणजेच गाव कामगार, तलाठी, कोतवाल, मंडळाधिकारी यांच्यामार्फत अन्नधान्याचे किट वाटप करण्यात येत आहेत. अतिसंवेदनशील भागांमध्ये जाऊनही तलाठ्यांना नागरिकांसाठी कीट उपलब्ध करून द्यावी लागतात. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत तसेच आत्‍मविश्‍वासात नक्कीच वाढ होईल, असे कोलते पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT