पुणे

आजारांचे वेळीच निदान करण्यासाठी आरोग्य मोहीम

CD

पुणे, ता. २६ : कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी वयाच्या तिशीनंतर उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ३० वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येत्या १० डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
बदलती जीवनशैली, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, तंबाखूचे सेवन आणि मानसिक ताण यांमुळे असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजार सुरुवातीला लक्षणे दाखवत नसल्याने त्यांचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता नियमित तपासणी करण्यावर या अभियानात भर देण्यात येत आहे. या मोहिमेत उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या पाच आजारांची तपासणी केली जाणार आहे. संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात येणार असून, त्यांचा पाठपुरावाही केला जाणार आहे.


कोणतीही लक्षणे नसली, तरी वयाच्या ३० वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची आहे. संशयित रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी संदर्भित करण्यावर अभियानात भर दिला जात आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hapus Mango Rate : 1 डझन आंबा तब्बल 2500 रुपयांना! कोल्हापूरच्या बाजारात तमिळनाडूतून 'हापूस'च्या 40 पेट्या दाखल, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

रेल्वेच्या गोंधळात तिघांचा मृत्यू, एकाने एसी लोकलच्या धडकेत गमावला जीव; तर घाटकोपर-विक्रोळीदरम्यान दोन मृतदेह

महाराष्ट्रात साडेचार वर्षांत १३ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या; दररोज आठ जणांनी संपवले जीवन

Pune Graduate Election Result : पुणे पदवीधरसाठी मतमोजणीला सुरूवात, पहिल्या टप्प्यातील कौल दुपारनंतर येणार समोर; कोण मारणार बाजी?

Satara Drought: सातारा जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! धरणांत ८७.७८ टक्के साठा; तातडीने नियोजनाची गरज, टॅंकरची संख्याही वाढणार

SCROLL FOR NEXT