वडगाव मावळ - येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सुनील शेळके. यावेळी गजानन टोम्पे, शरदचंद्र माळी, मधुसूदन बर्गे, डॉ. चंद्रकांत लोहारे आदी. 
पुणे

आरोग्य विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही - सुनील शेळके

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्या मावळ तालुक्‍यातील आदिवासी, कातकरी, मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी प्राधान्याने व्यवस्था करावी, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (ता. ३०) सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शेळके बोलत होते. तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, डॉ. गणेश बागडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, वडगाव, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व सर्व खात्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

आरोग्य खात्याने तालुक्‍यातील सुमारे ६५ हजार कुटुंबांना भेटी देऊन परदेशवारी करुन आलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या तसेच पुणे, मुंबई व इतर ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. ही संख्या सुमारे साडेतीन हजार असून, सर्वांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोन ग्रामीण रुग्णालयात शीघ्र प्रतिसाद पथके व तीन ठिकाणी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, तालुक्‍यातील हॉस्पिटलची यादीही तयार करण्यात आली आहे. या सर्व हॉस्पिटलमधून चाळीस व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी आदींनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले असून, प्रत्येक गावात पन्नास खाटांचे विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी, कातकरी व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना प्राधान्याने मदत करण्याची सूचना आमदार शेळके यांनी केली. अशा लोकांची तातडीने यादी तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT