Health Sakal
पुणे

Pune News : आरोग्य धोक्यात! ‘नैसर्गिक’च्या नावाखाली रसायनांचा मारा

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करताय ना ! हे चांगलेच आहे; पण त्याचबरोबर काही पूरक आहार (सप्लिमेंट्स) खाताय का? मग, सावधान.

योगिराज प्रभुणे

पुणे - शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही व्यायाम करताय ना ! हे चांगलेच आहे; पण त्याचबरोबर काही पूरक आहार (सप्लिमेंट्स) खाताय का? मग, सावधान. कारण तुम्ही पोषकद्रव्ये नाही तर अक्षरशः वेगवेगळी रसायने आपल्या पोटात घेत आहात. त्याचा फायद्यापेक्षा तुमच्या शरीराला तोटा निश्चित जास्त होतो, असं स्पष्ट मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

आपण डॉक्टरांकडे जातो किंवा व्यायामशाळेत जातो तेव्हा आपल्याला काही ‘सप्लिमेंट’ घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यात वेगवेगळ्या चवीच्या प्रथिनांची पावडर असते. यातून तुमचे शरीर सुदृढ राहील, अशा जाहिरातीही केल्या जातात. पण, खरा प्रश्न आहे की, अशा प्रकारची पूरक पोषकद्रव्ये आपल्या शरीरासाठी खरोखरच आवश्यक आहेत का? याबाबत यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपिन विभूते यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सिंथेटिक पोषकद्रव्ये म्हणजे काय?

बाजारात उपलब्ध असलेली ९५ टक्के पोषकद्रव्ये ही सिंथेटिक प्रकारात आहेत. याचा अर्थ नैसर्गिक प्रकारात उपलब्ध असलेली पोषकद्रव्ये वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांच्या माध्यमातून प्रयोगशाळेत तयार केली जातात. त्यामुळे नैसर्गिक आहारातून मिळणाऱ्या पोषकद्रव्यांची तुलना रासायनिक पद्धतीने केलेल्या पोषकद्रव्यांशी होऊ शकत नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

पोषकद्रव्यांचा व्यापार

‘वेगवेगळ्या कंपन्या विविध प्रकारची पोषकद्रव्यांचे उत्पादन करतात. त्यांचा हा व्यापार २२ अब्ज अमेरिकी डॉलरचा आहे. वेगवेगवेगळ्या प्रकारची व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरसची निरोगी शरीरासाठी आवश्यकता असते; पण शरीराला कशा प्रकारे पोषकद्रव्ये मिळतात, हे महत्त्वाचे ठरते. ते नैसर्गिक स्रोतांतून मिळत आहेत की, कृत्रिम पद्धतीने आपण शरीरात घेत आहोत, याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे’, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

सेंद्रिय पोषकद्रव्ये

काही जण सेंद्रिय पोषकद्रव्ये (ऑरगॅनिक सप्लिमेंट) आहारात घेत असल्याचे सांगतात; पण त्यातही प्रिझर्व्हेटिव्ह, फ्लेवर आणि रसायनांचा वापर केलेला असतो. त्याशिवाय त्यांची साठवणूक करता येत नाही. आपल्या कायद्यात अशी तरतूद आहे की, १० टक्के घटक सेंद्रिय आणि ९० टक्के सिंथेटिक असले तरीही त्याला सेंद्रिय उत्पादन म्हणून जाहिरात करता येते. त्यातून आता आपण काय खातो, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे,.

शरीरावर काय परिणाम?

अँस्कॉर्बिक अॅसिडच्या माध्यमातून व्हिटॅमिन ‘सी’ मिळते. डेस्ट्रो आणि लेव्हो प्रकारांत हे व्हिटॅमिन असते. बहुतांशवेळा आपले शरीर डेस्ट्रो प्रकारात हे व्हिटॅमिन घेते. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या व्हिटॅमिन ‘सी’मध्ये हे प्रकार नसतात. ते ‘सिंथेटिक केमिकल अॅस्कोर्बिक अॅसिड’ असते. त्यात पेट्रोलियम पदार्थ आणि फ्लेवर्स असतात. त्यामुळे ते शरीरात गेल्यानंतर आक्रमण ठरते. कोणत्याही संत्रीवर्गीय फळांतून मिळणारे सी व्हिटॅमिनशी याची तुलना करता येणार नाही, असेही डॉ. विभूते यांनी नमूद केले.

दुष्परिणाम काय?

  • प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याने सप्लिमेंटला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो

  • मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याचा धोका

  • पचनसंस्थेच्या समस्या वाढतात

  • पोषकद्रव्यांचा समतोल बिघडतो

आपल्या शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारची पोषकद्रव्ये आवश्यक असतात. पण, ती नैसर्गिक स्रोतांतूनच शरीरात जाणे गरजेचे आहे. तरच ते तुमच्या शरीरासाठी दीर्घकाळ उपयुक्त ठरेल. कोणत्याही गोळ्या सातत्याने घेणे हे शरीरासाठी चांगले नसते.

- डॉ. बिपिन विभूते, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT