PMP Sakal
पुणे

पीएमपीच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य योजना उपलब्ध

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अंशदायी आरोग्य योजना लागू झालेली आहे. मात्र, या योजनेचा लाभ महिला कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव मिळत नव्हता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या (PMP) अंशदायी वैद्यकीय योजनेचा (Medical Scheme) संपूर्ण लाभ आता कर्मचारी महिला (Women) व त्यांच्या कुटुंबीयांनाही (Family) मिळणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून याबाबतची प्रक्रिया रखडली होती. आता ही योजना लागू झाल्याने ४३५ कर्मचारी महिलांना आरोग्य सुविधा (Health Facility) उपलब्ध झाली आहे. (Health plans available for female PMP employees)

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अंशदायी आरोग्य योजना लागू झालेली आहे. मात्र, या योजनेचा लाभ महिला कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कारणास्तव मिळत नव्हता. कोरोनाच्या काळात आढावा बैठकांत ही बाब लक्षात आली. त्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता सरळ सेवेतून अथवा अनुकंपा तत्त्वावर रुजू झालेल्या कर्मचारी महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पीएमपीत रुजू झालेल्या कर्मचारी महिलेचे लग्न झालेले नसल्यास त्यांच्या आई-वडिलांचीच नावे वैद्यकीय कार्डमध्ये समाविष्ट करता येतात. लग्न झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांची नावे रद्द होतील आणि पती, सासू-सासरे आणि दोन मुलांची नावे त्यात समाविष्ट होतील. पती, सासू-सासरे आणि मुले शासकीय सेवेत असतील, तर एकाच संस्थेकडून अंशयादी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅंम पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. तसेच स्वेच्छा निवृत्ती किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी महिलांनाही हाच नियम लागू असेल. दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT