सकस आहाराचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात स्पर्धांचे आयोजन
१ डिसेंबरपासून शाळास्तरावर निबंध, पोस्टर स्पर्धा; जानेवारीत वॉकथॉन, सायकल रॅली आणि आहार मेळावा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : सकस व संतुलित आहार, अन्न सुरक्षा आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात ‘योग्य आहार – चळवळ’ अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धा, तसेच वॉकथॉन, सायकल रॅली आणि ‘इट राइट मेळाव्या’चे आयोजन करण्यात येणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण व राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविले जात आहे. निबंध व पोस्टर स्पर्धा पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटांत होणार आहेत. आरोग्यदायी जीवनशैली, फळे-भाज्यांचे महत्त्व, संतुलित आहार, अन्नभेसळ प्रतिबंध आणि सुरक्षित अन्न हाताळणी हे स्पर्धांचे विषय असतील.
प्रत्येक शाळेने दोन्ही गटांतील उत्कृष्ट तीन निबंध आणि तीन पोस्टर निवडून शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
शाळास्तरीय स्पर्धा १ ते १५ डिसेंबरदरम्यान, तर जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान होईल. ११ जानेवारीला वॉकथॉन व सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर १८ ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘इट राइट मेळावा’ होईल. यामध्ये माहितीपर स्टॉल, पथनाट्य, प्रात्यक्षिके आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.या अभियानात शाळा, महाविद्यालये आणि विविध शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.