पुणे, ता. २२ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या शिबिरात राज्यातील तब्बल ६०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम सातत्याने सुरू असून, विविध शहर, ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबिरासाठी पुण्यात आले होते. पिनॅकल इंडस्ट्रीज, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय कृत्रिम अंग निर्वाण निगम (अॅलिम्को) यांच्यातर्फे या शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.