पुणे

'आयटी'बाबतच्या याचिकेवर १५ मे रोजी सुनावणी;सर्वोच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे - आयटीमधील कर्मचाऱ्यांना कोरोना कालावधीत कमी करू नये आणि त्यांचा पूर्ण पगार देण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. त्यामुळे कंपन्यांच्या कामगार कपातीच्या धोरणामुळे अडचणीत आलेल्या आयटी कर्मचाऱ्यांच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या आहेत. 

नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेटचे (नाइट्स) सरचिटणीस हरप्रीत सलुजा आणि ॲड. राजेश इनामदार यांनी ॲड. अमित पै यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्या. एस. के. कौल आणि न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली असून, त्यावर १५ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते ॲड.इनामदार यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

करोनामुळे लॉकडाउन असतानाही, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) कर्मचारी आणि वेतन कपात केली जात आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने २० मार्च रोजी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना निर्देश देत, या संकटकाळात कामगार व वेतन कपात करू नका, अशा सूचना सर्व सरकारी व खासगी कंपन्यांना देण्यास सांगितले होते. त्यानंतर केंद्राने २९ मार्च रोजी सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश देत, औद्योगिक क्षेत्र, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनातील कर्मचाऱ्यांना कोणतीही कपात न करता पगार देण्याचे आदेश देण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही कर्मचारी, वेतन कपात, सक्तीच्या रजेवर पाठविणे असे निर्णय घेतले जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांकडून केला जात आहे. 

करोनाकाळात कर्मचारी कपात आणि वेतन कपात करू नये, याबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी आयटी कंपन्यांनी करावी, या मागणीसाठीच ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. 
-हरप्रीत सलुजा, याचिकाकर्ते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT