पुणे

पुणे :..अन् रिक्षाचालकाने अनुभवले वर्दीतील 'देवदूत'

सकाळ वृत्तसेवा

पुणे : छातीमध्ये असह्य वेदना होऊ लागल्याने रिक्षाचालकाने रस्त्याने जाणाऱ्या तीन वाहतूक पोलिसांना मदत मागितली. वाहतूक पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता, त्या रिक्षाचालकास दुसऱ्या रिक्षात बसवून तत्काळ वाडिया कॉलेजजवळील कॅनोट प्लेस ते ससूनमध्ये अवघ्या 4 मिनिटांत पोचविले. ससूनमध्येही डॉक्‍टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. वाहतूक पोलिसांच्या रूपाने धावून आलेल्या देवदूतांनी माणुसकी दाखवत रिक्षाचालकास जीवदान दिले. 

अशोक राजाराम वाडेकर असे संबंधित रिक्षाचालकाचे, तर पोलिस नाईक मिनीनाथ भागवत, पोलिस शिपाई राहुल ढमढेरे व पोलिस नाईक विनोद कायगुडे असे वाहतूक पोलिसांचे नाव आहे. तिघेही कोरेगाव पार्क वाहतूक विभागामध्ये कार्यरत आहेत. 10 ऑक्‍टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिस कायगुडे, भागवत व ढमढेरे असे तिघे जण वाडिया कॉलेजच्या दिशेने जाताना त्यांच्याकडे कॅनॉट प्लेसजवळ एका रिक्षाचालकाने मदत मागितली. त्यांच्या छातीत वेदना होत असल्याने पोलिसांनीही त्यांना तत्काळ रिक्षात बसवून ससूनला हलविले. अद्ययावत दुचाकीच्या सायरनमुळे वाहतूक कोंडीचा अडथळा दूर होऊन ते अवघ्या चार मिनिटांतच ससूनला पोचले. 

दरम्यान, कागदपत्रांची तांत्रिक प्रक्रिया नंतर करू, अगोदर रुग्णाचे प्राण वाचवा, असे पोलिसांनी डॉक्‍टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्‍टरांनीही तत्काळ उपचाराला सुरुवात केली. रुग्णाला योग्य वेळी मदत मिळवून दिल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. तोपर्यंत वाडेकर यांच्या मुलालाही बोलावण्यात आले. या घटनेतून बरे झाल्यानंतर वाडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची भेट घेऊन पोलिसांच्या रूपाने मदतीला धावून आलेल्या देवदूतांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. 

छातीत कळा येऊ लागल्याने पोलिसांना मदत मागितली. त्यांनी मला उचलून दुसऱ्या रिक्षात ठेवले. ससूनला नेऊन चांगले उपचार केले. पोलिसांच्या मदतीमुळेच आज मी जिवंत आहे. 

- अशोक वाडेकर, रिक्षाचालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT