Temperature Sakal
पुणे

पुण्यात उन्हाचा चटका वाढणार

पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांपासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांपासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता.

पुणे - शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळांपासून पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

शहरात शनिवारी ३७.१ अंश सेल्सिअस कमाल आणि २४.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत (ता. १८) शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहू शकते. असे असले तरी कमाल तापमानात हळू-हळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवडाभरात पुणे आणि परिसरात पारा पुन्हा ४१ अंशांच्या घरात पोहचू शकतो. त्यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

‘असानी’ चक्रीवादळ निवळल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा ताप पुन्हा वाढू लागला आहे. विदर्भात तर पारा ४५ च्या पुढे पोहचला आहे. दरम्यान, रविवारी (ता. १५) विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा वर्तविण्यात आला आहे. राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली. सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४६.५ तर नीचांकी तापमान महाबळेश्‍वर येथे १७.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनासाठी पोषक हवामान निर्माण होत आहे. तर सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि लगतच्या उपसागरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT