पुणे

पुण्यासह राज्यात उन्हाचा चटका 

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यात किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सोमवारी पुणे परिसरात नोंदली गेली. सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसहून अधिक किमान तापमान वाढल्याचे निरीक्षण पुणे वेधशाळेने सोमवारी सकाळी नोंदविले. पुण्यात किमान तापमान 16.1, तर लोहगाव येथे 18.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याने किमान तापमानाचा पारा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. 

राज्याच्या इतर भागांप्रमाणेच पुण्यातही फेब्रुवारीच्या मध्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे 38.1 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर सर्वांत कमी किमान तापमानाचा पारा नागपूर येथे 12 अंश सेल्सिअस नोंदला गेला. पण, पुणे शहर आणि परिसरात किमान तापमानाच्या पाऱ्याने सरासरीपेक्षा सर्वाधिक उसळी मारली. लोहगाव येथे किमान तापमानात सरासरीपेक्षा 4.3 अंश सेल्सिअसने, तर पुणे आणि नाशिक येथे 4.1 अंश सेल्सिअसने वाढले. 

राज्याच्या बहुतांश भागात आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यातून कमाल तापमानाचा पाराही वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने उन्हाचा चटका वाढेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. 18) आकाश निरभ्र राहणार असले, तरीही बुधवारपासून (ता. 19) पुढील दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली. त्यामुळे किमान तापमानाचा पारा वाढून 18 अंश सेल्सिअसपर्यंत पोचेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT