heavy rain in baramati monsoon 2023 farmer agricultural Sakal
पुणे

Baramati Rain News : विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह बारामतीत ढगफुटीसदृश पाऊस...

विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाटासह बारामतीत मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसाने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता heavy rain in baramati monsoon 2023 farmer agricultural

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाटासह बारामतीत मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसाने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्याच्या अनेक भागात दुपारनंतर ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी शेताच्या ताली फुटून पाणी वाहत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

काही मिनिटातच पाण्याची तळी साचून पाणी वाहू लागल्याने व पावसाचा जोर कायम असल्याने हा ढगफुटीसदृश पाऊस असल्याचेच बारामतीकरांचे म्हणणे होते. दुपारी साडेचारच्या सुमारास अंधारुन आले आणि जोरदार पावसास प्रारंभ झाला. पावसाचा जोर इतका होता की काही मिनिटात रस्त्यांवरुन पाणी वाहू लागले. शहरातील सर्व सखल भागात पाण्याची मोठी तळी साचली आहेत.

आज पावसाचा जोर जसा होता तसाच ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट देखील होता. अनेकदा तर ढगांच्या प्रचंड आवाजाने बारामती शहर हादरत होते. पावसाचा जोरही कमालीचा असल्याने रस्त्यावरील वाहतूक थंडावली होती. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले असून उस, डाळींब व भाजीपाला पिकांचे प्रामुख्याने मोठे नुकसान झाले आहे.

आज रविवार असल्याने कार्यालय व शाळांना सुटी असल्याने लोक घरातच असल्याने पावसात भिजण्याची वेळ आली नाही. यंदाच्या पावसाळयातील बारामतीत पडलेला हा पहिला दमदार पाऊस आहे. अशाच भीजपावसाची बळीराजाला प्रतिक्षा आहे.

पावसाने ओढ दिल्याने बारामतीतील खरीप हंगाम हातचा निघून गेला आहे, या पावसावरच रब्बीच्या पिकांचे जीवदान अवलंबून असल्याने हा पाऊस बारामतीसाठी महत्वाचा आहे. ओढे नाले भरुन वाहतील अशा दमदार पावसाची बारामतीकरांना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV Vehicles: मध्यमवर्गासाठी खुशखबर! इलेक्ट्रिक कारचं स्वप्न पूर्ण होणार; केंद्र सरकारचा मास्टरस्ट्रोक, काय घडलं?

Ranji Trophy: विदर्भाचा २३ वर्षीय गोलंदाजाचा विकेट्सचा षटकार; ध्रुव जुरेलला शतकापासून रोखलं

खरंच गरज होती का? टीआरपीसाठी अल्पवयीन अभिनेत्रीकडून करून घेतला असा सीन; मालिकेवर नेटकरी संतापले

Video: सूरज चव्हाणने घेतलं अजितदादांच्या चितेचं दर्शन; भावुक होत म्हणाला, मी कोणाकडे बघायचं...

Latest Marathi News Live Update : पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांची दिल्लीत बदली

SCROLL FOR NEXT