heavy rain in pune flood like kharadi damage vehicle water stuck monsoon rain Sakal
पुणे

Pune Rain News : पावसामुळे खराडीत पूरस्थिती घर सोसायटी, वाहनांचे नुकसान

गर रस्ता परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खराडीतील आपले घर सोसायटी येथे पूरस्थिती निर्माण होऊन वाहनांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्ता परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खराडीतील आपले घर सोसायटी येथे पूरस्थिती निर्माण होऊन वाहनांचे नुकसान झाले. तसेच नागरिकांच्या घरातही पाणी गेले. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा सामना येथील रहिवाशी अनेक वर्षांपासून करीत आहेत.

नगर रस्ता परिसरात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. विमाननगर, संजय पार्क, नगर रस्ता आणि खराडीतील अनेक सकल भागात पावसाचे पाणी साचले होते. पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका खराडी येथील आपले घर या भागात बसला.

आपले घर सोसायटीतील लेन क्रमांक सहा येथे सकल भाग असल्यामुळे आणि पावसाळी वाहिन्या नसल्यामुळे पाणी जमले. शिवाय येथील सांडपाणी वाहिन्या खूप जुन्या आणि लहान असल्यामुळे पावसाचे पाणी जायला अडथळा येतो.

ही समस्या दूर करावी या मागणी करता दोन महिन्यांपूर्वी येथील रहिवाशांनी आंदोलनही केले होते. मात्र आंदोलनावेळी मिळालेल्या आश्वासनावर कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. आज दुपारी झालेल्या पावसामुळे या भागात पाणी साचून काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले. तर वाहने पाण्यात बुडाल्याने नुकसान झाले.

येथे पावसाळी वाहिनी टाकावी लागेल. आज कर्मचारी पाठवून पावसाचे पाणी काढण्यासाठी नागरिकांना मदत करायला सुरुवात केली आहे

- हेमंत देसाई (उपाभियंता, ड्रेनेज विभाग, पुणे महानगरपालिका)

येथे पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होतो. परंतु ही समस्या सोडवण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या हे वरिष्ठ अधिकारी सांगतील.

पूजा ननावरे ( कनिष्ठ अभियंता नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय)

पुणे महानगरपालिकेचे अधिकारी येऊन फक्त पाहणी करून आणि आश्वासन देऊन जातात. प्रत्यक्षात काम होत नाही. पावसाळी वाहिनी टाकण्याकरता क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने पाऊले उचलावीत.

तानाजी शेरखाने (नागरिक )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT