heavy rain in pune for the second day in a row Rain Update  
पुणे

Pune Rain News: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार! वाहनंही गेली वाहून

सकाळ डिजिटल टीम

Pune Rain News: मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाना आज सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली, कालप्रमाणे आज देखील शहरात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत २० मिनिटांत रस्त्यावर पाणी साचलेले होते.

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने लावली हजेरी लावल्याने शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतर रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही ठिकाणी गारा पडण्याच्या देखील घटना देखील घडल्या. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले दरम्यान दूपारनंतर पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरातील मध्यवर्ती भागातील नाना पेठ, चमडी गल्ली या ठिकाणी जोरदार पाऊस पावसात गाड्या पडून वाहून गेल्याचा प्रकार देखील घडला. यासोबतच शहरातील पेठांच्या भागात तसेच कर्वेनगर, सिंहगड रस्ता, शिवणे परिसरात मुसळधार पाऊस झाला. हरकानगर परिसरात जोरदार पावसामुळे लावण्यात आलेले संरक्षक बॅरिकेट्स पडले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीरकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT