Vadgaon Sheri Cemetery in Flood Water sakal
पुणे

Pune Rain Update : नगर रस्ता परिसरात पावसामुळे दाणादाण; जीवनमान विस्कळीत

वडगाव शेरी स्मशानभूमी पाण्यात बुडाल्यामुळे काही नागरिकांना विधी करण्यात आल्या अडचणी.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - पावसामुळे संपूर्ण नगररस्ता परिसरात जीवनमान विस्कळीत झाले. वडगाव शेरी, खराडी दर्गा परिसर, कल्याणीनगर, विमाननगर, विमानतळ परिसर, संजय पार्क, विमानतळ रस्ता हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. झाड पडणे, सोसायटीत पाणी भरणे, वाहने पाण्यात अडकणे, नदीकाठच्या भागात पाणी घुसणे यासोबतच सतत सुरू असलेला पाऊस यामुळे सगळीकडे दानादान उडाली.

नगर रस्त्यावर खराडी दर्गा परिसरात कमरे इतके आणि फिनिक्स व शास्त्रीनगर चौकात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथ होऊन दोन्ही बाजूंना वाहतूक कोंडी झाली. रामवाडी भुयारी मार्गात, कल्याणी नगर येथील सेंट अर्नोल्ड शाळेत जवळील नाल्यात पूरस्थितीमुळे वाहतूक बंद करण्यात आली होती.

वडगाव शेरी स्मशानभूमी पाण्यात बुडाल्यामुळे काही नागरिकांना विधी करण्यात अडचणी आल्या. बॉम्बे सर्फर्स कॉलनी मध्ये पावसाळी वाहिनी आणि सांडपाणी वाहिनी एकमेकांना जोडल्यामुळे सर्वत्र पाणी साचले होते. साईनाथ नगर येथील नदीकिनारी असलेली काही घरे पाण्यात बुडाली. वडगाव शेरीतील उज्वल गार्डन, सुप्रभात सोसायटीत कमरे इतके पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले.

विमानतळा समोरील एरो मॉल समोरील रस्ता, फाईव्ह नाईन चौकाच्या अलीकडे रस्त्यावर, संजय पार्क, पुरु सोसायटीच्या रस्त्यावर , बेलवेडर सोसायटीसमोर रस्त्याला ओढ्याचे रूप प्राप्त झाले होते.

वडगाव शेरीतील आनंद पार्क चौकात शाळकरी विद्यार्थ्यांच्या चारचाकी वर झाड पडल्याने अपघात झाला. सुदैवाने चारचाकीतील विद्यार्थी बचावले. एक दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला.

विमान नगर येथे राजीव नगर नॉर्थ जवळील नाला एका बांधकाम व्यवसायिकाने बुजवल्यामुळे या परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.

पावसाचा फटका बसलेली ठिकाणे

* विमाननगर राजीव नगर नॉर्थ सोसायटी

* फाईव्ह नाईन चौक रस्ता

* संजय पार्क सोसायटी

* रामवाडी भुयारी मार्ग

*आर्नोल्ड शाळेसमोरील नाला

* बॉम्बे सॅफर्स कॉलनी

* खराडी दर्गा परिसर

* उज्वल गार्डन सोसायटी

* सुप्रभात सोसायटी

* वडगाव शेरी स्मशानभूमी

*बेलवेटर सोसायटी रस्ता

* हरी नगर, कल्याणी नगर

* साईनाथ नगर वडगाव शेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT