Pune Rain Sakal Digital
पुणे

Pune Rain : आंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ अन् काळजाचा ठोका चुकला

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मुसळधार पाऊस सुरू झाला... तासभर पाऊस होऊनही जोर काय कमी होण्याचे नाव घेत नव्हता... बघता बघता आंबिल ओढ्याच्या पातळीत वाढ होती... काळजाचा ठोकाच चुकला अन पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पण सुदैवाने ओढ्याचे पाणी पात्रबाहेर न आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. ही अवस्था झाली होती कात्रज पासून ते नवी पेठेपर्यंत आंबिल ओढ्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची.  

पूर्ण दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असताना रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरवात झाली. पाऊस प्रचंड मोठा असल्याने रस्त्यांना अवघ्या काही वेळात नद्यांचे स्वरूप आले. पावसाचा जोर कमी होत नसताना आंबिल ओढ्याच्या परिसरातील रहिवाशांच्या मनात भितीचे ढग जमा होऊ लागले. ओढ्याला लागून असलेल्या घरांमधील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी घुसते की काय अशी भीती वाटायला सुरवात झाली. जसा जसा वेळ जात होता, तसे नागरिकांमधील चलबिचल वाढली. इतका मोठा पाऊस होता की बाहेर पडणेही शक्य होत नव्हते.

अंबिल ओढ्याची पाणी पातळी वाढली असली तरी कात्रज परिसरात तुलनेने पाऊस कमी आहे आणि तलावातील पाणी कमी झाल्याने तो भरून वाहण्याची शक्यता कमी असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी या भागातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते नागरिकांना धीर देण्यासाठी बाहेर पडले.

‘‘आजच्या पावसामुळे २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवण झाली. आमचे घर ओढ्यालाच लागून असल्याने घरात पुन्हा पाणी घुसते की काय अशी भीती वाटली. नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण झाल्याने धोका टळला.’’

- गणेश पवार, टांगेवाला कॉलनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur President’s Rule Ends: वर्षभरानंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट संपुष्टात ; युमनाम खेमचंद सिंह घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ!

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये १४ फेब्रुवारीपर्यंत लोकांसाठी जमावबंदीची अंमलबजावणी

"आता मी कार्यक्रम करणार नाही" ट्रोलिंगनंतर गौतमीने घेतलेला निर्णय ; त्या कठीण काळाविषयी म्हणाली..

Bagless Days: विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय! सरकारी शाळांमध्ये 'बॅगलेस डे' लागू; राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT