Pune School News sakal
पुणे

Pune Schools: पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Pune Rain) व हवामान विभागाने (Whether Update) गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना (School) सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Pune Corporation) हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. (Pune School News In Marathi)

संततधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा (Pune Rain Alert) देण्यात आलेला आहे.

मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी ही विलंब होत आहे. अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Rain Update)

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे म्हणाले, "हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी शहरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल. शुक्रवारी शाळा सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी आढावा घेऊन घेतला जाईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिवृष्टी, शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) ता. १३ ते १४ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

सिंहगड बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र

पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गावर दरड कोसळण्याच्या भीतीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. त्याशिवाय संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कात्रज जुना बोगद्याजवळ दरड कोसळल्याची घडना घडली आहे.

लोणावळ्यात पाचनंतर पर्यटनाला बंदी घातली

गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणे शहर आणि परसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुणे शहराजवळील लोणावळा येथे मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र, कोसळणारा पाऊस आणि संभव्या धोका लक्षात घेता प्रशासनाकडून लोणावळ्यात सायंकाळी पाचनंतर पर्यटनाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. लोणावळ्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून, भुशी धरणाने रौद्र रूप धारण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT