heavy rain in rajgad torna 113 mm of rain recorded in 24 hours pune Sakal
पुणे

Pune Rain News : राजगड तोरणा भागात अतिवृष्टी; २४ तासात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद

पर्यटकांसह नागरिकांना खबरदारीचे प्रशासनाचे आवाहन

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे,(पुणे ) : राजगड ,तोरणा भागासह रायगड जिल्ह्यालगत काल रात्री पासून अतिवृष्टी सुरू आहे. गेल्या चोवीस तासात ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पर्यटक तसेच नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. दरडींचा धोका असलेल्या ठिकाणी जाऊ नये तसेच धबधबे, गडकोटांवर साहसी क्रीडा करु नये असे आवाहन वेल्हे तालुका तहसीलदार दिनेश पारगे यांनी केले आहे.

या बाबत तहसीलदार पारगे यांनी पुरातत्व विभाग व पोलीस विभागाला पत्र देऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची सुचना दिल्या आहेत. गेल्या २४ तासात वेल्हे येथे विक्रमी ११३ मिलीमीटर पाऊस पडला. या पेक्षा दुप्पट पाऊस रायगड जिल्ह्यालगतच्या मढे घाट, घोल दापसरे खोऱ्यात कोसळत आहे. त्यामुळे नद्या ओढे नाल्यांना पुर आले आहेत.

पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असलेल्या राजगडावर शनिवारी (२२) पासून कड्याच्या दरडी कोसळत आहेत. सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने उभ्या केलेले बॅरिकेड्स काढून पर्यटक राजगडाच्या बालेकिल्ल्यावर धाव घेतली.

कड्याची दरड कोसळल्याने सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने बालेकिल्ल्याचा मार्ग केला होता. मात्र सायंकाळीच बॅरिकेड्स लावुन बंद करण्यात आला होता. मात्र बॅरिकेड्स काढून पर्यटकांनी धाव घेत आहेत. गडावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही.

पुरातत्व विभागाचे दोन पाहरेकरी व दोन खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र सुट्टीच्या दिवशी पाच ते सहा हजारांवर पर्यटकांची गर्दी असते त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अपुरी पडत आहे. वेल्हे तालुका तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले,

राजगडावर दरडी कोसळण्याचा घटना घडली. त्यामुळे पर्यटकांनी पुरातत्व विभागाने मनाई केलेल्या भागात जाऊ नये. वेल्हे हा डोंगरी दुर्गम तालुका आहे. सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पर्यटकांनी तोरणा गड व इतर भागात आवश्यक खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT