कोकण, घाटमाथ्यावर वाढणार पावसाचा जोर
पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’
पुणे : कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने, आज (ता. १२) सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्याचे आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, मध्य प्रदेशमधील कमी दाबाचे केंद्र, सिधी, रांची, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर सक्रिय होता. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोडक्षेत्र कायम आहे.
मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत ताम्हिणी येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
आज (ता. १२) कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार सरीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार
वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. आज (ता. १२) पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.
मंगळवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)
---
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२८.९---२१.९
अहिल्यानगर---३१.८---२३.५
धुळे---३२.०---२१.४
जळगाव---३०.६---२३.६
जेऊर---३१.५---२०.५
कोल्हापूर---२६.३---२२.३
महाबळेश्वर---१९.४---१७.४
मालेगाव---३०.२---२२.२
नाशिक---२७.३---२२.२
निफाड---३१.२---२३.४
सांगली---२८.९---२१.९
सातारा---३०.१---२१.७
सोलापूर---३४.०---२२.५
सांताक्रूझ---३१.६---२३.७
डहाणू---३१.२---२४.९
रत्नागिरी---३०.५---२५.०
छत्रपती संभाजीनगर---३१.२---२२.४
धाराशिव---३०.६---२२.०
परभणी---३२.६---२२.०
परभणी (कृषी)---३२.६---२०.६
अकोला---३२.०---२४.६
अमरावती---२९.६---२२.६
ब्रह्मपुरी---३३.०---२३.१
बुलडाणा---२९.६---२२.६
चंद्रपूर---३३.८---२५.२
नागपूर---३२.८---२२.२
गडचिरोली---३२.६---२५.०
गोंदिया---निरंक---२२.०
नागपूर---३२.८---२२.२
वर्धा---३२.०---२४.४
वाशीम---३०.०---१९.६
यवतमाळ---३०.६---२२.८
----
--चौकट--
सरासरी तापमान (अंश से.)
विभाग---किमान---कमाल
उत्तर महाराष्ट्र---२१.४---३२.०
पश्चिम महाराष्ट्र---१७.४---३४.०
कोकण---२३.७--३२.५
मराठवाडा---२०.६---३२.६
विदर्भ---१९.६---३३.८
---
फोटो आहे. (agnDistrict rain forecast)
फोटो ओळ : बुधवारी (ता. १२) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)
जोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) :
पुणे घाटमाथा.
जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट)
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.