पुणे

विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ ः पिंपरी चिंचवड शहराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने सुमारे एक तास तुफान बॅटिंग केली. सायंकाळी सातपर्यंत -- मिमी पावसाची नोंद झाली होती. विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नोकरदार आणि वाहनचालकांची मोठी धांदल उडाली. शहरातील जनजीवन थोडा वेळ विस्कळीत झाले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तापमानाचा पारा वाढला होता. सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सुमारे अर्धा ते एक तास झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. रस्त्यावरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. एक तासातच ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचनंतर वातावरणात अचानक बदल होऊ लागला. काळ्या ढगांनी संपूर्ण शहर व्यापले आणि काही क्षणांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शहराच्या अनेक भागांत पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. मुख्य चौकांमध्ये आणि सखल भागांत पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांची दमछाक झाली. विशेषतः पिंपरी, काळेवाडी आणि निगडी परिसरामध्ये काही काळ वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक चौकांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पावसामुळे पादचारी आणि कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यालगत व्यवसाय करणारे छोटे व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांनी आपला माल वाचवण्यासाठी धावपळ केली. काही ठिकाणी दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT