heavy rain in pune 
पुणे

धुवाधार पाऊस अन वाहतूक कोंडीने अशी झाली पुणेकरांची दैना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मंगळवारी पहाटेप्रमाणेच रात्रीही कोसळलेल्या धुवाधार पावसाने पुण्याची अक्षरशः दैना उडाली. रस्त्या-रस्त्यांवर वाहणारे पावसाच्या पाण्याचे लोंढे, चौका-चौकांत झालेली वाहतूक कोंडी, बंद झालेला वीजपुरवठा आणि रस्त्यांत वाहने उभी करून, मिळेल त्या आडोशाला दाटीवाटीत उभे राहिलेले पुणेकर... असे चित्र पुण्यात मंगळवारी रात्री दिसत होते.

रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे प्रचंड वेगाने वाहत होते. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह, उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. नगर रस्त्यावर वाघोलीच्यादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने दोन्ही बाजूंना दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तीच स्थिती सातारा रस्त्यावर स्वारगेटच्या परिसरात होती. 

पुणे-बंगळूर महामार्गावर (कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण) दोन्ही बाजूंना पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. सूस, पाषाण रस्त्यावरून पावसाचे पाणी वेगाने वाहत येऊन, सखल भागात साचत होते. सिंहगड रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा जोर इतका भयंकर होता की, त्यामुळे आनंदनगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीही पडल्या. पौड रस्त्यावर भूगावमध्ये वाहनांच्या दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.

हिंजवडी-पुणे प्रवास तीन तासांचा
हिंजवडीवरून पुण्याकडे येणारा १८ किलोमीटरच्या प्रवासासाठी मंगळवारी रात्री तब्बल अडीच ते तीन तास लागले. वाकड उड्डाण पुलाच्या परिसरात पाणी साचले होते. पावसाच्या मुसळधार सरी आणि त्याच वेळी रस्त्यांवर गुडघाभर पाणी यातून वाहन चालवण्यासाठी चालकांना कसरत करावी लागली. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता, अशी माहिती अभियंता शशांक भंडारी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT