rain haveli 
पुणे

पुणे जिल्ह्यातील या परिसरात पावसामुळे रस्तेच गेले वाहून

शरद पाबळे

केसनंद (पुणे) : पूर्व हवेलीत काल मध्यरात्री ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाल्यामुळे अष्टापूर परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रस्ते वाहून गेल्याने वाडेबोल्हाई ते कोरेगाव मूळ हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर,वाडेगावात विजेच्या धक्क्याने एक जण मृत्यूमुखी पडला आहे. 

अष्टापूर, शिरसवडी, बिवरी, परिसरात गेल्या २५ वर्षात प्रथमच एवढा पाऊस झाल्याने ओढे- नाले फुटले, तर शेतात पाणी घुसल्याने भुईसपाट झालेल्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले. पीएमआरडीएचा वाडेबोल्हाई ते कोरेगाव मूळ हा रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतुक बंद झाली असून, गोतेमळा ते अष्टापूर गाव हा रस्ता आणि माळवाडी ते जगताप वस्ती या रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर, अनेक ठिकाणी विजेचे खांबही पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच, वाडेगाव, डोंगरगाव परिसरातही अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वाडेगावात कुंभार वस्तीवर शेळीला विजेचा धक्का बसल्याने मदतीला गेलेला रामेश्वर पुरी नावाचा ३५ वर्षाचा तरूण मृत्यूमुखी पडला आहे. 

या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधिसह संबंधित सर्व यंत्रणांना कळवून स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप व पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, दिलीप वाल्हेकर, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, संदीप गोते, सुधीर गोते, रमेश कदम, बाळासाहेब गावडे, सतीश नागवडे, दीपक गावडे, योगेश शितोळे, नितीन मेमाणे, रामदास कोतवाल, दत्ता कटके आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, आमदार अॅड. अशोक पवार यांनी सायंकाळी भर पावसात हवेली प्रांताधिकारी सचिन बावकर, तहसीलदार सचिन कोळी, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्तीसह पिकांच्या नुकसान भरपाईबाबत योग्य त्या कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत. 
 

पावसामुळे वाहून गेलेल्या वाडेबोल्हाई ते कोरेगाव मूळ या रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास येत असून, दर्जेदार रस्ते दुरुस्ती आणि शेतकऱ्यांच्या भुईसपाट झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबत योग्य त्या कार्यवाहीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
 - अशोक पवार, आमदार, शिरूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT