पुणे

PuneRains : अवघ्या दोन तासात पावासाचा हाहाकार (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः मुसळधार पावसाने बुधवारी रात्री पुण्यात अक्षरशः हाहाकार उडाला. शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या ओढ्यांना पूर आला. तर, कात्रज तलावही "ओव्हर फ्लो' झाला. आंबिल ओढ्याच्या दोन ठिकाणी भिंती ढासळल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे ओढ्याच्या पूराचे पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये वेगाने शिरले. परिणामी, सहकारनगरमधील संजिवनी सोसायटी, गणेश सोसायटी, तर असाच, प्रकार कोल्हावाडी येथील लेन नंबर एकमधून जाणाऱ्या ओढ्याची भिंत कोसळली.

 

कात्रज तलाव ओसांडून वाहल्याने पाण्याच्या लोंढ्यात दोन जण वाहून गेल्याची भीती महापालिकेच्या आपत्कालिन विभागातर्फे काही नागरिकांनी व्यक्त केली. आंबिल ओढ्याची भिंत फुटल्यामुळे सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मागील गुरुराज सोसायटीसह अनेक सोसायट्यांमध्ये बुधवारी रात्री पाणी शिरले. तर, कोल्हेवाडी येथील लेननंबर एकमधून जाणाऱ्या ओढ्याची भिंत ढासळल्याने शेजारच्या वस्तीत पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. त्यामुळे तेथे नागरिक अडकले.

बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. रात्री दहा वाजल्यानंतर पावासाचा जोर प्रचंड वाढला. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या अंबिल ओढा, माणिक नाला, भैरोबा नाला, नगझरी नाला या या नाल्यांना पूर आला. त्याचे पाणी आजू-बाजूच्या वस्त्यांमध्ये घुसले.

कात्रज तलावातून पाणी ओसंडून वाहू लागले. ते पाणी मोठ्या प्रमाणात आंबिल ओढ्याला आल्याने सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मागील बाजूस या ओढ्याची भिंत ढासळली. ही रात्री घटना सुमारे दहा वाजता घडली. त्याच वेळी कोल्हेवाडी लेन नंबर एकच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याची भिंतही पाण्याचा प्रचंड वेगाने पडली. त्यामुळे त्या बाजूच्या वस्तीत पाण्याचे लोट शिरले. झपाट्याने पाण्याची पातळी वाढू लागली. सहकारनगरमध्ये संजीवन, गणेश सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. ओढ्याची भिंत ढासळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT