Madat 
पुणे

"हळदीच्या हातां'साठी मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : लाडक्‍या लेकीच्या विवाहाची तयारी करत असतानाच झोपडीला आग लागून विवाहासाठी बांधलेला बस्ता, भांडी आदी साहित्य जळून खाक झाले. लेकीची पाठवणी करण्याअगोदरच बापाच्या संसाराची राखरांगोळी झाली. देवजाळी (ता. जुन्नर) येथे ही घटना घडली. या कुटुंबाला आमदार अतुल बेनके युवा मंचच्या वतीने विवाहासाठी आवश्‍यक असलेला बस्ता व संसार उपयोगी भांडी नववधूला भेट देण्यात आली.

हिवरे तर्फे नारायणगाव हद्दीतील देवाची जाळी येथे ठाकर समाजाची वस्ती आहे. येथे मंगळवारी (ता. 10) सायंकाळी चारच्या सुमारास लागलेल्या आगीत येथील गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे यांच्या झोपड्यांना आग लागली. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र झोपड्या पाचटाच्या असल्यामुळे काही वेळात झोपड्या जळून चार कुटुंबाचा तोडका मोडका संसार उद्‌ध्वस्त झाला.

सयाजी मधे यांची मुलगी छकुली हिचा विवाह गुरुवारी (ता. 12) सावरगाव येथे नियोजित होता. यामुळे मधे यांनी लाडक्‍या मुलीच्या विवाहासाठी बस्ता बांधला होता. मात्र लागलेल्या आगीत विवाहासाठी आणलेल्या साड्या, संसार उपयोगी भांडी मुलीचे दागिने आदींसह झोपडीतील धान्य, कपडे जळून खाक झाले. लेकीची पाठवणी करण्याअगोदरच स्वतःच्या संसाराची राखरांगोळी झाल्याने सयाजी मधे यांना मानसिक धक्का बसला. मुलीच्या विवाहाच्या चिंतेत असलेल्या मधे यांना आमदार अतुल बेनके युवा मंचचे सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी मधे यांना आधार दिला.

शुक्रवारी सायंकाळी युवा मंचचे सूरज वाजगे, ग्रामस्थ शिवदास विधाटे, बाळू मुळे, गंगाधर मुळे यांनी छकुलीच्या विवाहासाठी आवश्‍यक असलेली संसार उपयोगी भांडी, मुलीच्या साड्या, मानापानाचे साहित्य नारायणगाव येथे खरेदी केले. बस्त्याचे साहित्य सयाजी मधे यांच्या ताब्यात दिले. या वेळी हिवरे तर्फे नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येकी पन्नास किलोग्रॅम गहू, तांदूळ, एक महिन्याचा किराणा या आदिवासी कुटुंबांना भेट दिला. मानवतेच्या भावनेतून केलेल्या या मदतीमुळे आदिवासी कुटुंबाला आधार मिळाला व मुलीच्या विवाहाची चिंता दूर झाली असल्याने सयाजी मधे यांनी ग्रामस्थ व युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT