help1 
पुणे

सांगली, कोल्हापूरकरांना आंबेगाव तालुक्याचा मदतीचा हात

डि. के. वळसे-पाटील

मंचर : सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आंबेगाव तालुक्यातून 8000 अन्नाची पाकिटे तयार करण्यात आली आहेत. ही पाकिटे इस्लामपूरकडे रवाना करण्यात आली आहेत. 

दरम्यान, शुक्रवारी रात्री दहा वाजता अन्नाची पाकिटे तयार करण्याचे काम मंचरला सुरू झाले. शनिवारी सकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे काम सुरू होते. अन्नाच्या पाकिटामध्ये पुरी, चटणी, बुंदी, केळी, बिस्किट, पिण्याचे पाण आदी साहित्याचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील व गोवर्धन प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी याकामी पुढाकार घेतला.

दरम्यान, शिवगिरी मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री दहा वाजता नियोजनाची बैठक झाली. त्यानंतर ताबडतोब खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवातही झाली. तब्बल 70 महिला, सात आचारी , भीमाशंकर कारखाना, शरद बँक, पराग कारखाना, गोवर्धन डेअरी या प्रकल्पातील 50 स्वयंसेवक या मदत कार्यात सहभाग घेतला. पाच टेम्पोतून ही मदत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पोचवली जाणार आहे.

कोणत्या रस्त्याने वेळेत मदत पोचेल याबाबतचे नियोजन आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी संजय पाटील यांनी केले आहे. दरम्यान पहिल्या टप्यात तीन तेंपोतून खाद्य पदार्थ इस्लामपूरकडे रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT