dudhane.jpg 
पुणे

पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात

सकाळवृत्तसेवा

वारजे (पुणे)  : पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात अशा आशयाची बातमी सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच कर्वेनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने  व राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्यावतीने पेपरवाल्या काकांना मदत म्हणून सकाळच्या माध्यमातून पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाला एक लाखाचा धनादेश देण्यात आला. गुरुवारी सकाळमध्ये पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात असे आव्हान करणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.  ऊन, पाऊस, वारा याची पर्वा न करता वृत्तपत्र विक्रेते आपल्या व्यवसायाची लढाई अखंडितपणे लढत आहे.  या पावसाळ्यातही व कोरोना लढ्यातही ते वर्तमानपत्र सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. 

कितीही आपत्तकालीन परिस्थिती आली तरीही पेपरवाले काका अडचणींना सामोरे जाऊन घरोघरी पेपर वाटत असतात. मात्र, गेली अनेक दिवस पेपर बंद असल्याने हेच पेपरवाले काका अडचणीत आले आहेत. त्यांना मदतीचा हात मिळावा याच उद्देशाने दुधाने यांच्यावतीने एक लाख रुपयाचा धनादेश व कोरोना पासून संरक्षण व्हावे म्हणून सॅनिटाइजर स्टँड सकाळचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक संतोष कुडले  व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरती आर्थिक मदत केल्यामुळे आनंद दिसून येत होता. यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे,  उपाध्यक्ष दत्ता पिसे,  सचिव अरुण निवंगुणे,  विश्वस्त यतीन चौधरी,  सहखजिनदार महादेव नेमाणे,  केदार मारणे,  दीपक निवंगुणे,  संजय फाटक,  अतुल पारगे,  श्रीकांत शिंदे,  संदीप सांगळे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साठे हे वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. तर नगरसेविका लक्ष्मीताई  दुधाने राष्ट्रवादी  काँग्रेस  कोथरूड विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने,  अतुल खसे, सचिन शिंदे,  तेजस भागवत, पुष्कर भिलारे यावेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 

लॉकडाऊनच्या काळात अनेक दिवस वर्तमानपत्रे बंद होती. त्यामुळे वर्तमानपत्र विक्रेत्यांना अनेक अडचणींना आता तोंड द्यावे लागत आहे.  18 जानेवारीच्या सकाळमध्येही पेपरवाल्या काकांना द्या मदतीचा हात ही बातमी वाचण्यात आल्याने तसेच विक्रेत्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन वर्तमानपत्र विकणार्‍यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत करण्यात आलेली आहे. इतर दानशूर व्यक्तींनी ही अशी मदत करावी असे आवाहन यावेळी नगरसेविका दुधाने  यांनी यावेळी केले. सकाळप्रमाणे शहरातील इतर सर्व वृत्तपत्र समूहांबरोबर ही विक्रेत्याच्या मदती संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे. दुधाने कुटुंबामार्फत मिळालेल्या मदतीचा निश्चितीच  गरजू विक्रेत्यांना फायदा होईल , त्या बद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देत आहोत.
विजय पारगे, अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT