worker.jpg 
पुणे

उपाशीपोटी कुटुंबीयांनी गाठले 'सकाळ' कार्यालय

सुवर्णा नवले

पिंपरी : 'घरात वाळलेल्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढत आहोत. रेशनवर धान्य मागायला गेलो असता आम्हांला हाकलून दिलं जातं. गावाकडं गेलो असतो तर निदान पोट तरी भरलं असतं. उपासमार झाली नसती. आम्ही उपाशीपोटी कसेही दिवस काढू हो...! पण लेकरांबाळांचं काय करायचं? अशा विवंचनेत असलेल्या एका कुटुंबाने 'सकाळ' कार्यालयाचे दरवाजे ठोठावले. अन्‌ अखेर त्याच्या उपाशीपोटी असलेल्या कुटुंबीयांची वणवण थांबली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळपासूनच अन्नाच्या शोधात निघालेले वाल्हेकरवाडी, रिलायन्स टॉवर, सायली कॉम्लेक्‍स येथे भाडेतत्त्वावर राहत असलेल्या उमाकांत सरवदे कुटुंबीयांची ही करुण कहाणी आहे. घरात सात माणसांचे कुटुंब आहे. घरात आठ दिवसांपासून अन्नधान्याचा कण नाही. सरवदे हे एका खासगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. कंपनीच्या मालकाने अद्यापपर्यंत त्यांना पगार दिला नाही. सुपरवायजरला कॉल केल्यास तो उचलत नसल्याचे त्यांनी सांगितले.

सरवदे यांच्या पत्नी म्हणाल्या, 'काही स्वयंसेवी संस्था जेवणाची मदत करत आहेत. पण ती तुटपुंजी ठरत आहे. आमच्या पदरी तीन मुलं आहेत. रेशनकार्ड गावाकडचे आहे. तीन वेळा धान्य मागायला गेलो तर दुकानांतून आम्हाला अक्षरक्ष: हाकलून दिलं जात आहे. घरात बसायचं पण खायचं काय? लॉकडाउनने उपासमार व्हायला लागली आहे. हाताला कामधंदा मिळायला हवा. अन्यथा आम्हाला जगणं अवघड होईल.

लॉकडाउनपर्यंत मिळाला दिलासा...
अखेर 'दैनिक सकाळ' कार्यालयातून त्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. उपाशीपोटी असलेल्या सरवदे कुटुंबियाला अजमेरा कॉलनी येथील 'बी द चेंज' या संस्थेच्या विशाल मासूळकर यांनी तातडीने 'सकाळ' कार्यालयातच जेवण पुरविले. जैन सकल समाजानेही घरपोच जेवण देण्याची तयारी दर्शविली. तसेच कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी अन्नधान्याचे कीट लवकरात लवकर घरपोच दिले. त्यामुळे लॉकडाउनपर्यंत होणारी या कुटुंबीयांची फरपट थांबली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gears Up for UCC : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यात घेतला जाणार मोठा निर्णय

Petrol-Diesel-CNG Price: 4 जुलैचे अपडेटेड दर जाहीर! मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Latest Marathi Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या जोरामुळे भात लागवडीला मिळाला वेग

Khadakwasala Dam Water : खडकवासला प्रकल्पातील धरणांत अर्धा टीएमसी पाणी वाढ

Karul Ghat Landslide : करूळ घाटातून प्रवास करताय? दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा; व्हाळात वाहून गेलेल्या तरुणाबाबतही वाईट बातमी

SCROLL FOR NEXT