sakal
पुणे

पुणे : ज्ञानशक्ती संस्थेची मदत घेऊ : पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख

पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यातून भरोसा सेलसाठी कैलाश सत्यार्थी फाउंडेशन व ज्ञानशक्ती संस्थेची मदत घेऊ- देशमुख

सकाळ डिजिटल टीम

मंचर : “देश पातळीवर काम करणार्या कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनने बचपन बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून देशात एक लाखापेक्षा जास्त मुलामुलींची बाल शोषण, बाल कामगार व बाल तस्करीतून सुटका केली आहे. संस्थेच्या कामाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाडे दिले आहेत.

नोबेल पुरस्कार मिळालेल्या या संस्थेबरोबर मंचर (ता.आंबेगाव) येथील ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने एकत्रितपणे काम सुरु केले आहे. त्याचा फायदा निश्चित पोलीस दलाला होणार आहे. “भरोसा सेल”च्या माध्यमातून लहान मुले व महिलांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी या संस्थांची मदत पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्यातून घेतली जाईल.” असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे उपजिल्हा रुग्णालयात कैलाश फाउंडेशन व ज्ञानशक्ती संस्थेने एकूण आठ लाख रुपये किमतीचे ३० ग्रामपंचायतीना व उपजिल्हा रुग्णालयाला कोविड कीटचे वाटप डॉ. देशमुख यांच्या हस्ते केले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पराग मिल्क फुड्सचे कार्यकारी संचालक प्रीतम शहा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, अरुणा दत्तात्रय थोरात, सभापती संजय गवारी, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होते.

विवेक वळसे पाटील म्हणाले “गेली १६ वर्ष महिलांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबरच पाणलोट क्षेत्र विकासातही ज्ञानशक्ती विकास वाहिनीचे मोठे योगदान आहे. यापुढे गार्गी विशाल काळे पाटील यांच्या माध्यमातून मुलामुलीना योग्य प्रबोधन करण्याचे काम संस्था चांगल्या पद्धतीने करेल असा. विश्वास आहे.”

प्रीतम शहा म्हणाले “ दुध व्यवसायात व सेंद्रिय शेती बाबत महिलामध्ये जनजागृती होण्यासाठी ज्ञानशक्तीने पुढाकार घ्यावा. त्यासाठी पराग मिल्क फूड्स व भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मतर्फे संस्थेला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल.”

ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी विशाल काळे पाटील म्हणाल्या “ राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पाठबळ व मार्गदर्शन मिळाल्यामुळे संस्थेने महिला व बाल सक्षमीकरण क्षेत्रात काम केले आहे.यापुढे शाळा महाविद्यालयात जनजागृतीचे काम केले जाईल. कैलास फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक प्रसाद ताठे यांनी स्वागत केले. शहा, वळसे पाटील, डॉ. देवमाने,डॉ. सुदाम खिलारी यांची मनोगते झाली.

“काही एनजीओ फक्त फोटो काढण्यापुरते कार्यक्रम घेतात. अनुदान मागतात व सरकारची कामे आम्हीच केली असे दाखवतात. पण गेली १६ वर्ष महिला सक्षमीकरण व लहान मुलांसाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. संस्थेने आदिवासी भागात अधिक लक्ष द्यावे. त्यासाठी पोलीस दलाची मदत मिळेल.”- डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी सतीश सालियान यांची नोटीस स्वीकारली

SCROLL FOR NEXT