'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट'  राजेंद्र पोकळे स्मरणार्थ मुलगा आकाश मुलगी अपूर्वा कड व जावई यश कड यांनी संस्थेस ५३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट' राजेंद्र पोकळे स्मरणार्थ मुलगा आकाश मुलगी अपूर्वा कड व जावई यश कड यांनी संस्थेस ५३ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. Sakal
पुणे

पुणे : वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रमाला मदत

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - घरातील सदस्यांच्या वाढदिवसाला पार्टी करण्याऐवजी अनाथाश्रम, वृद्धाश्रमात जाऊन अन्नदान, वस्तू देऊन साजरा करण्याचा सामाजिक जाणिवेचा पायंडा त्यांनी केला होता. मागील वर्षी त्यांचेच कोरोनाने निधन झाले. त्यांचे तिथीनुसार वर्षश्राद्ध व जन्मदिवस एकच आल्याने ७५ ओलांडलेली आई व त्यांची पत्नी यांनी पुरोगामी निर्णय घेतला. सध्याच्या प्रचलित पद्धतीने वर्षश्राद्ध न करता अनाथाश्रमाला ५३ हजार रुपयांची मदत करीत तो पायंडा त्यांच्या मुलाच्या माध्यमातून पुढे सुरू ठेवला. राजेंद्र गेनभाऊ पोकळे यांचे मागील वर्षी मे महिन्यात कोरोनाच्या आजाराने निधन झाले. राजेंद्र यांनी त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवस मित्र परिवाराला पार्टी न देता अनाथाश्रम, वृद्धाश्रमात जाऊन साजरा केला. राजेंद्र हे धायरीतील शेतकरी कुटुंबातील. शेती, दुभती जनावरे पाळणे त्यांना आवड होती. पोकळे डेअरी नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. धायरीतील धायरेश्वर पतसंस्थेत व्यवस्थापक होते.

वर्षश्राद्धची सध्याची पध्दत आहे. असे वर्ष श्राद्ध न करता राजेंद्र यांचे ८२ वर्षाचे वडील गेनभाऊ पोकळे यांची ७५ ओलांडलेली आई शारदा, पत्नी सुजाता यांनी सामाजिक भान जपत वर्षश्राद्धचा अनावश्यक खर्च टाळला. त्यातून वाचविलेली रक्कम एखाद्या सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरविले. त्यांनी अनिल सोपान पोकळे यांच्या सहकार्याने नसरापूर माळेगाव येथील 'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट' नसरापूर, माळेगाव या संस्थेस ५३ हजार रुपयांची आर्थिक मदत पोकळे कुटुंबीयांकडून करण्यात आली. ही मदत संस्था चालक हभप नवनाथ महाराज निम्हण यांच्याकडे ही देणगी देण्यात आली. राज्यातील आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलांचा सांभाळ 'माऊली अनाथाश्रम निराधार सेवा ट्रस्ट' ही संस्था करते. त्या मुलांचे शालेय आणि सांप्रदायीक शिक्षण, भोजन आणि निवासाची व्यवस्था ही संस्था करत आहे. ही मदत देण्यासाठी याप्रसंगी पोकळे परिवारातील कै. राजेंद्र यांची आई शारदा, पत्नी सुजाता, मुलगा आकाश, मुलगी अपूर्वा कड, जावई यश कड, शशिकांत पोकळे, काका डॉ.नंदकिशोर मते व पोकळे मित्र परिवार उपस्थित होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT