bopodi.jpg
bopodi.jpg 
पुणे

बोपोडीतील व्यापाऱ्यांना 'त्यांनी' दिला मदतीचा हात

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार (पुणे) :  बोपोडी परिसरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर बोपोडी मधील सर्व व्यापारी वर्गाला सॅनिटायझर, मास्क, अर्सेनिक अल्बम 30 व ग्लोव्हज्चे वाटप करण्यात आले. प्रत्येक जण आपल्या परीने काही ना काही योगदान देत आहे. पण आपली स्वतःची काळजी आपणच घेतली पाहिजे हे गरजेचे आहे. बोपोडीकर आपली काळजी घ्या असे सांगत बोपोडीतील सामाजिक कार्यकर्ते अमित मुरकुटे यांनी बोपोडी गावठाण व बोपोडी परिसरात स्वतः जाऊन सुरक्षेची साधने व्यापाऱ्यांना दिली.

9 मार्चला पुण्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यावेळी केंद्र सरकारच्या वतीने देशात कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले. देशासह महाराष्ट्रात पुणे शहर पिंपरी चिंचवड येथे रुग्ण सापडण्यास सुरवात झाली होती. संपूर्ण पुणे शहरात कोरोनाने हाहाकार केला असताना त्यावेळी बोपोडी औंध बाणेर हे फक्त ग्रीन झोन मध्ये होते. खूप चांगल्या प्रकारे बोपोडीकरांनी काळजी घेतली होती.

मात्र, चौथ्या लॉकडाउननंतर सर्वात पहिला कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण बोपोडीत सापडली तेव्हापासून आतापर्यंत बोपोडीत मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. एके काळी ग्रीन झोन असलेली बोपोडीचे रूपांतर आता मायक्रो कंटेन्मेंट झोन मध्ये झाले आहे. पोलिस, महापालिका प्रशासन पुरेपूर काळजी घेत आहे. मात्र, आता नागरिकांनी ही काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT