महापालिका भवन - स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हेमंत रासने (डावीकडील) यांचे अभिनंदन करताना महापौर मुरलीधर मोहोळ आणि नवे सभागृहनेते धीरज घाटे. 
पुणे

दोन अर्थसंकल्प मांडण्याची रासनेंना संधी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेतील सत्तास्थापनेपासून तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप नगरसेवक हेमंत रासने यांच्या गळ्यात शुक्रवारी अखेर या पदाची माळ पडली. या पदाच्या निवडणुकीत रासने यांना सर्वाधिक दहा मते मिळाल्याने ते विजयी झाले. हे पद रासने यांच्याकडे तेरा महिने राहील. महापालिकेचे पुढील दोन अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे. 

दरम्यान, रासने यांच्याविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार अशोक कांबळे यांना सहा मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत निवडून आल्याने सुनील कांबळे यांनी ‘स्थायी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पदासाठी निवडणूक झाली. भाजपकडून रासने आणि आघाडीतर्फे कांबळे उमेदवार होते. त्यात रासने हे निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केली. रासने यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात जल्लोष केला. 

महापालिकेच्या सदाशिव पेठ-नारायण पेठेतून (प्रभाग क्र.१५) रासने हे निवडून आले आहेत. याआधी ते दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अनुभवी नगरसेवक म्हणून ‘स्थायी’चे अध्यक्षपद मिळविण्यासाठी रासने यांनी २०१७ पासून ‘फिल्डिंग’ लावली होती; परंतु पक्षातील गटातटाच्या राजकारणाने या पदाने रासने यांना हुलकावणी दिली होती. मात्र, कांबळे यांच्या राजीनाम्यानंतर ‘स्थायी’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी रासने यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. कांबळे यांची मुदत आणखी तीन महिने होती. त्यामुळे या मुदतीसह पंधरा महिन्यांसाठी रासने अध्यक्ष असतील. त्यामुळे त्यांना महापालिकेचा २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांचा अथसंकल्प मांडता येणार आहे. 

महसूल वाढविण्यास प्राधान्य
पुणे शहराचा विस्तार लक्षात घेता महापालिकेच्या अर्थसंकल्पाची व्याप्ती वाढविणार असून, अर्थसंकल्पाच्या रक्कमेपेक्षा पुणेकरांसाठी पायाभूत सेवा-सुविधांवर भर असेल. त्या पुरविण्यासाठी कोणत्याही कराचा बोजा पुणेकरांवर न टाकता महसूल वाढविण्याची योजना आखण्याला प्राधान्य असेल, असे स्थायी समितीने नवे अध्यक्ष हेमंत रासने यांनी शुक्रवारी सांगितले. स्थायीच्या अध्यक्षपदावर निवड होताच रासने यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. पुणेकरांच्या समस्या, त्यावरील उपाय, निधी आणि भविष्यातील परिणाम या मुद्द्यांवर त्यांनी भूमिका मांडली.

महापालिकेचे उत्पन्न वाढल्याशिवाय विकासकामे करणे शक्‍य होत नाहीत. त्यामुळे केवळ योजना जाहीर करण्यापेक्षा आधी महसूल वाढविण्याचा प्रयत्न आहे. ठराविक भागांऐवजी संपूर्ण शहराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प उभारण्यात येतील. मूळ अर्थसंकल्प अमलात आणण्यासाठी वर्गीकरण टाळण्याचा प्रयत्न असेल. महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. 
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती पुन्हा लांबणीवर, बैठक अचानक स्थगित

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा तमन्ना भाटिया पुन्हा एकत्र, ‘व्वन’ चित्रपट २८ ऑगस्टला भेटीला!

Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

SCROLL FOR NEXT