hemant rasne chairman of the standing committee pune  sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड

१० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांच्यावर विजय मिळवला. रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज (ता.४) महापालिकेत पार पडली. १० विरूद्ध ६ असा रासने यांनी राष्ट्रवादीचे उमदेवार प्रदीप गायकवाड यांच्यावर विजय मिळवला. रासने यांची सलग चौथ्या वेळी अध्यक्षपदावर निवड झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत २८ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. त्यासाठी १ मार्च ते १ मार्च या १४ दिवसांसाठी नवे स्थायी समिती अध्यक्ष निवडले गेले आहेत.

१ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला, त्यानंतर आज सकाळी महापालिकेत निवडणूक झाली. पीएमपीचे व्यवस्थापक संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये भाजपचे १०, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. त्यामुळे रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही भाजपने दगाफटका होऊ नये यासाठी व्हीप काढला होता. रासने यांचा विजय निश्चित असल्याने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते जमा झाले होते. महापालिकेच्या बाहेर ढोलताशे वाजवून, घोषणाबाजी करून रासने यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

" पक्षाच्या नेत्यांनी मला सलग चौथ्या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याची संधी दिली प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांना तसा न्याय मिळतो हे याचे उदाहरण आहे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद स्थायी समिती कधी बरखास्त होत नाही त्यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे."

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT