तेल अवीव ता. २ (वृत्तसंस्था) : फ्लायदुबईच्या विमानातील इस्रायली दंतवैद्य डॉ. शोटा मुसायेव यांनी प्रसंगावधान आणि वैद्यकीय कौशल्याचा वापर करत कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित यांना वाचविण्यासाठी धाव घेतली.
डॉ मुसायेव यांनी सांगितले की, कॅप्टन स्मित यांच्यावर हल्ला झाल्यानंतर अन्य प्रवाशांसह ते कॉकपिटच्या दिशेने धावले. त्यावेळी स्मित हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ हे विमान अवघ्या दोन मिनिटांत सुमारे १६ हजार फूट खाली आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत प्रवासी यानिव हायून यांनी वैमानिकाच्या नियंत्रणातून हल्लेखोराला खेचून बाजूला केले आणि विमान पुन्हा स्थिर केले. त्यानंतर विमानातील तिसऱ्या वैमानिकाने सौदी अरेबियातील तबूक येथे विमान सुरक्षितपणे उतरविले. त्यामुळे विमानातील सर्व १८० प्रवाशांचा जीव वाचला.
विमानातील थरार सांगताना डॉ. मुसायेव म्हणाले, ‘‘मी आणि आणखी एका प्रवाशाने हल्लेखोराचे हात बांधण्यासाठी हेडफोनच्या तारा वापरल्या. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने फारसे काही सांगितले नाही. तो ओमानचा असल्याचे त्याने सांगितले आणि त्यानंतर वारंवार, “मला ठार मारा, मला ठार मारा, असे तो म्हणत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रतिकार केला नाही,” असे मुसायेव यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ. मुसायेव यांनी कॅप्टन मच्छार यांना प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले. डोके, मान आणि हातांना झालेल्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यांनी रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.