पुणे

आदिवासी निसर्गवैभवाला विकासाची प्रतीक्षा

CD

फुलवडे, ता. २६ : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली असतानाही अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित आहेत. आहुपे, आघाणे, तिरपाड येथील वनराई, कोंढवळ, पाटण, डोन, बोरघर व फुलवडे परिसरातील धबधबे तसेच डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सुमारे ३० किलोमीटरचा रमणीय रिंगरोड पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. आदिवासी भागातील भट्टीचे रान, सह्याद्रीची जैवविविधता, घनदाट जंगल आणि डोंगररांगा यांचा पर्यटनाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने विकास करण्याची गरज आहे.
पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबरदरम्यान हिरवाईने नटलेला हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो तर ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ हिवाळी पर्यटनासाठी अनुकूल ठरू शकतो.

हे आहेत पर्यटन विकासातील अडथळे
- पर्यटनस्थळांकडे जाणारे अरुंद रस्ते, घाटातील धोकादायक वळणे,
- अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि मोबाइल नेटवर्कची समस्या
- रस्त्यांचे रुंदीकरण, नियमित डागडुजी, धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना
- दिशादर्शक फलक आणि आवश्यक त्या ठिकाणी मोबाइल नेटवर्कची उपलब्धता
- प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारी एसटी बससेवा

यांना होईल फायदा
- स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अनेक संधी
- हॉटेल, खानावळ, चहा-नाश्ता केंद्रे, होमस्टे, लॉज
- वाहनचालक, जीप-टॅक्सी चालक, पार्किंग कर्मचारी
- दुकानदार, फळभाजी विक्रेते, ट्रेक आयोजक, फोटोग्राफर

पारंपरिक खाद्यपदार्थ बाजारपेठ
आदिवासी महिलांच्या बचतगटांना स्थानिक धान्य, तांदूळ, नाचणी, वरई, मध, बांबू उत्पादने, हस्तकला व पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

हे टाळावे
- पर्यटकांनी रात्री एकटे जंगलात जाऊ नये
- वनक्षेत्रात अनधिकृतपणे वाहन थांबवू नये
- जंगलातील शॉर्टकट किंवा अनधिकृत ट्रेकिंग मार्ग वापरू नयेत
- वन्यजीवांच्या जवळ जाऊन फोटोसाठी पाठलाग करणे किंवा सेल्फी घेऊ नये
- मोठ्याने ओरडणे, दगड मारणे किंवा प्राण्याला चिथावणे टाळावे
- वन्यजीवांच्या सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये

पर्यटकांनी लहान मुले व पाळीव प्राणी जंगलाच्या कडेला एकटे सोडू नयेत. वनविभागाच्या सूचना व प्रतिबंधित क्षेत्रांचे पालन करावे. स्थानिक वनरक्षक किंवा गाइडच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.
- रणजित जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य

पर्यटकांनी धोकादायक घोषित केलेल्या ठिकाणी जाऊ नये. घाटरस्त्यावर वाहन चालवताना वेग कमी ठेवावा. रस्त्यावर दरड किंवा पाणी आले असल्यास पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये. आपत्कालीन परिस्थितीत ११२ किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
- सागर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस ठाणे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष :१०७७
आपत्कालीन मदत : ११२
पोलिस : १००
रुग्णवाहिका : १०८
अग्निशमन : १०१

एकत्रित प्रयत्न करण्याची गरज
निसर्गसंपदा जपण्याबरोबरच स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण नागरिकांसाठी रोजगार व उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. त्यामुळे पर्यटन विकासासाठी प्रशासन, वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.
05610, 05613

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

MD Drugs Crackdown: न्हावरेत एमडी ड्रग्सविरोधात संयुक्त धडक कारवाई; ११.९० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत तर एक फरार

Crime News: माळेगाव पोलिसांची अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; दोन जण अटक, ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

SCROLL FOR NEXT