पुणे

झारखंड विद्यार्थी आंदोलन

CD

नोकरभरती परीक्षा रद्द करण्यास
उच्च न्यायालयाकडून स्थगिती

झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा सोरेन सरकारवर विश्वासघाताचा आरोप

रांची, ता. २२ (पीटीआय) : झारखंडमधील नोकरभरती परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी हेमंत सोरेन सरकारवर विश्वासघाता''चा आरोप केला आहे. आंदोलकांच्या मागणीनुसार सरकारने घेतलेल्या निर्णयाची न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

या मुद्द्यावरून भाजपने आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) भाजपकडून विद्यार्थ्यांचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा प्रत्यारोप केला आहे.

भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारामुळे सोरेन सरकारने २२ परीक्षा रद्द करून २३ परीक्षांच्या चौकशीचे आदेश दिले होते. यामुळे २६ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन शांत झाले होते. मात्र, या निर्णयामुळे यशस्वी उमेदवारांनी नोकरी जाण्याच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याच्या सरकारी अधिसूचनेला स्थगिती दिली. या निर्णयामुळे ‘जेपीएससी-जेएसएससी सुधारणा मंचा’च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रांचीमध्ये निषेध मोर्चा काढला. यावेळी पोलिसांशी त्यांची झटापट झाली. हजारीबाग आणि गिरिडीहमध्येही अशाच प्रकारचे निषेध व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी अल्बर्ट चौकात मुख्यमंत्री सोरेन आणि राहुल गांधी यांच्या पुतळ्यांचे दहन केले. सरकारने न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिस बळाच्या वापराचा निषेध केला, तर माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी ही कारवाई लोकशाही हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ‘जेएमएम’चे सरचिटणीस विनोद पांडे यांनी भाजपवर झारखंडचे सामाजिक वातावरण बिघडवल्याचा आरोप केला. दरम्यान, सीआयडीने या प्रकरणातील चौकशीची कक्षा विस्तारली असून, नागरिकांना गैरव्यवहाराबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत ३७ संशयितांची चौकशी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

MP Murlidhar Mohol : 'विकसित भारत’चा संकल्प प्रत्येक भारतीयाचा व्हावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

IMD Rain Alert : 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, काही भागांत ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या माघारीला पोषक स्थिती

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

SCROLL FOR NEXT