Raid Sex-Racket sakal
पुणे

Crime News : पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह परदेशी तरुणी ताब्यात

विमाननगरसह कोरेगाव पार्क परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विमाननगरसह कोरेगाव पार्क परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान, दलाल ऑनलाइन पद्धतीने सेक्स रॅकेट चालवीत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी दलाल इरफान ऊर्फ राहुल मदन ऊर्फ मदन सन्यासी याच्यासह तिघांविरुद्ध विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर आणि कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

तिघे दलाल आरोपी परराज्यातील असून, ते ऑनलाइन सोशल मीडियाचा वापर करून वेश्याव्यवसाय चालवत होते. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा केली.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, उपनिरीक्षक अश्विनी भोसले, तुषार भिवरकर, सागर केकाण, बाबा करपे, राजेंद्र कुमावत, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, अजय राणे, मनीषा पुकाळे, रेश्मा कंक यांच्या पथकाने निको गार्डन रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये छापा टाकला.

या हॉटेलमधील दोन खोल्यांमधून उझबेकिस्तानच्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यानंतर कोरेगाव पार्कमधील एका तारांकित हॉटेलमधून २८ वर्षीय तरुणीला ताब्यात घेण्यात आले. ही तरुणी मूळची राजस्थानमधील असून, चित्रपटात छोट्या भूमिका आणि मॉडेलिंग करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दलालांनी विमाननगर येथील हॉटेलमध्ये दोन आणि कोरेगाव पार्कमधील तारांकित हॉटेलमध्ये एक खोली आरक्षित केली होती. तेथे परदेशी तरुणींना बोलावून वेश्याव्यवसाय चालविण्यात येत होता.

टुरिस्ट व्हिसावर भारतात

उझबेकिस्तानमधील दोन तरुणी टुरिस्ट व्हिसावर दोन महिन्यांपूर्वी भारतात आल्या आहेत. त्यांना या व्यवसायातून भरपूर पैसे कमाविण्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तर, मूळ राजस्थान येथील तरुणी कोरेगाव पार्कमधील हॉटेलमध्ये चार दिवसांपासून मुक्कामी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

सादिल खर्चाअभावी शाळा 'व्हेंटिलेटर'वर; झेडपी शाळांची आर्थिक नाकेबंदी; शिक्षक, मुख्याध्यापकांना 'वर्गणी'चा आधार?

Lokayukta Raid : ...अन् 1 लाखाचा सौदा 75 हजारांवर ठरला! दुकानाचा ताबा मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT