पुणे

पुण्याहून कोल्हापूर-सांगलीकडे निघू नका; महामार्गावर आलंय पाणी

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : कोल्हापूरातील सांगली फाटा येथील पुणे बंगळुरू महामार्गावर पुराचे पाणी आल्याने येथून पुढे जाणारी वाहतूक बंद आहे. त्यामुळे पुण्याहून पुणे-सातारा महामार्गाने कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. महामार्ग पोलिसांकडून खेड-शिवापूर टोल नाक्यावरून कोल्हापूर सांगलीकडे निघालेल्या वाहनांना मागे वळविण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पूराने वेढले आहे. या पुराचे पाणी कोल्हापुरात सांगली फाट्यावर बंगळुरूकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेथून पुढे जाणारी वाहतूक बंद आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याहून कोल्हापूर आणि सांगलीकडे पुणे-सातारा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरून पुढे सोडले जात नाही.

महामार्ग पोलिसांचे पथक खेड-शिवापूर टोल नाक्यावरून कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहने अडवून त्यांना माघारी पाठवत आहेत. येथून फक्त साताऱ्यापर्यंत जाणाऱ्या वाहनांनाच पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे मालवाहतूक करणारे ट्रक रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून थांबत होते. तर कार आणि इतर लहान वाहनांमधील नागरीक पुन्हा माघारी फिरताना दिसून येत होते.

याबाबत महामार्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण रणदिवे म्हणाले, "कोल्हापूर येथे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. खेड-शिवापूर टोल नाक्यावरूनच कोल्हापूर आणि सांगलीकडे जाणारी वाहने मागे वळविण्यात येत आहेत. सदर परिस्थिती पाहता नागरीकांनीही कोल्हापूर, सांगलीकडे जाणे टाळावे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

Video : निष्ठा असावी तर अशी! मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने शेवटच्या श्वासापर्यंत कोब्राशी दिली झुंज; व्हिडिओ पाहून नेटकरीही हळहळले

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

SCROLL FOR NEXT