Old Mumbai-Pune Highway Sakal
पुणे

Old Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण करताना खडकी रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल व चित्रपट गृहाची जागा ताब्यात घेताना नुकसान भरपाई जास्त मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण करताना खडकी रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल व चित्रपट गृहाची जागा ताब्यात घेताना नुकसान भरपाई जास्त मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील स्थगिती उठवली असून, त्यामुळे जागा ताब्यात घेता येणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळा दूर झाला आहे.

महापालिकेने जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण हाती घेतले आहे. यामध्ये खडकी रेल्वे स्थानकासमोर जयहिंद चित्रपटगृह असून, ही जागा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ९९ वर्ष भाडे कराराने दिली आहे. त्याच जागेत एक हॉटेल ही सुरु झाले आहे.

ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरु केली, त्यावेळी कॅन्टोन्मेंटने जागा ताब्यात घेण्यास मान्यात दिली. पण जागेचे मूल्यांकन करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यास सांगितले.

महापालिकेने या मूल्यांकन करून घेतले, असता ४३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्‍चित झाले. पण ही रक्कम अमान्य असल्याने हॉटेल चालकाने महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले मूल्यांकन योग्य ठरवत मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देत भूसंपादनावरील स्थगिती उठविली.

महापालिकेतर्फे ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली, अशी माहिती मुख्य विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली. पथ विभागाचे प्रमख अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त महेश पाटील यावेळी न्यायालयात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vani News : नरहरी झिरवाळ यांच्या आठवणींतील दादा…..

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

सोलापुरातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा; पीडितेच्या बहिणीमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

IND vs NZ, 4th T20I: न्यूझीलंडची दणक्यात सुरुवात, नंतर भारतीय गोलंदाजांनीही दाखवला क्लास; पण तरी विजयासाठी विक्रमी धावांचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT