pune sakal
पुणे

Pune : पक्षांच्या अधिवासासाठी ‘फर्ग्युसन’ही समृद्ध; ८८ प्रजातींचा नोंद, विशेष उपक्रमाचे आयोजन

पुणे शहरातील टेकड्या हे गवताळ प्रदेश होते. या ठिकाणी बोरबाभूळ अशी वृक्षसंपदा होती. कालांतराने या टेकड्यांवर ग्लिसरिडीया, निलगिरी, सुबाभूळ अशी वृक्ष लागवड करण्यात आली. फर्ग्युसन परिसरातील टेकड्यांवरही हे बदल झाले.

सम्राट कदम

पुणे - शिक्षणाचा ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयात स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या ८८ प्रजातींचा अधिवास असल्याची माहिती नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून पुढे आली. दरवर्षी ‘ग्लोबल ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमातून सभोवतालच्या परिसरातील पक्षी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद केली जाते. फर्ग्युसनमध्ये या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात पक्षी निरीक्षण करण्यात आले.

असे झाले निरीक्षण..

- महाविद्यालयातील १४० प्रशिक्षीत विद्यार्थ्याचा सहभाग

- निरीक्षणासाठी आवारातील १५ ठिकाणे निश्चित करण्यात आली

- सकाळी साडेपाच ते रात्री साडेसात यावेळेत गटा-गटाने निरीश्रण

- प्रत्येकी १५ मिनीटाने १४०० निरीक्षणे नोंदविली गेली.

- माहिती www.ebird.org या ॲपवर अपलोड करण्यात आली

फर्ग्युसनच्या आवारातील पक्षी..

कावळे, कबुतर, मैना, घारी, बुलबुल, कोकीळ, पोपट, घुबड, पिंगळा, राखी धनेश या स्थानिक पक्षांसह सरडामार गरूड, निळी माशीमार, लाला छातीचा माशीमार, लाल कंठाचा माशीमार, हिरवट वटवट्या, मुकुटधारी पर्णवटवट्या, कृष्ण थिरथिरा, करड्या डोक्याची मैना या वैशिष्ट्यपूर्ण अधिवासाची गरज असणाऱ्या स्थलांतरीत पक्षांची नोंद करण्यात आली. बहुसंख्य स्थलांतरीत पक्षी दरवर्षी हिवाळ्यात हिमालयातून येत असतात.

वैशिष्ट्यपूर्ण निरीक्षणे

- विविध ८८ पक्षांच्या प्रजाती

- निळी माशीमार या जंगलात आढळणाऱ्या पक्षाने शहरात अधिवास केला

- लाल फुलांच्या काटेसावर झाडावर करड्या डोक्याची मैना आढळली

- दोन हजार पोपटांचा थवा

पुणे शहरातील टेकड्या हे गवताळ प्रदेश होते. या ठिकाणी बोरबाभूळ अशी वृक्षसंपदा होती. कालांतराने या टेकड्यांवर ग्लिसरिडीया, निलगिरी, सुबाभूळ अशी वृक्ष लागवड करण्यात आली. फर्ग्युसन परिसरातील टेकड्यांवरही हे बदल झाले. या बदलांसह या परिसरातील वृक्षसंपदा, प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक वाटते.

- प्रा. अविनाश मुंजे, फर्ग्युसन महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT